मराठा आरक्षण-भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी आता उच्च न्यायालयात बाजू मांडणार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


मराठा आरक्षणाला आव्हान देणार्‍या याचिकांवर उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ व भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी शासनाची बाजू मांडणार….
मा. ना. चंद्रकांत दादा पाटील.
मुंबई : ज्येष्ठ विधिज्ञ आणि देशाचे माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी उच्च न्यायालयात शासनाची बाजू भक्कमपणे मांडणार असून काल शनिवार दि. २ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे या प्रकरणी शासनाकडील सर्व माहिती जाणून घेतली.
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. हरीश साळवे यांना माहे फेब्रुवारी–मार्च दरम्यान जागतिक स्तरावरील काही महत्त्वाच्या सुनावण्या असून त्यामुळे या कालावधीत ते इथे उपलब्ध नाहीत. मात्र, या याचिकांवर उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी बुधवार दि. ६ फेब्रुवारी पासून सुरू होणार असल्याने त्यावेळी शासनाची भूमिका भक्कमपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ नियुक्त करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. महाधिवक्ता अॅड. आशुतोष कुंभकोणी यांच्या बरोबर अॅड. विजय थोरात, अॅड. साखरे असे दिग्गज वकील या प्रकरणी संपूर्ण अभ्यास करून न्यायालयात शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी या पूर्वीच नियुक्त करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ आणि देशाचे माजी अॅटर्नी जनरल  मुकूल रोहतगी यांना या प्रकरणी विनंती केली असून त्यांनी ती मान्य केली आहे. त्यानुसार त्यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाने काढले असून, त्यांच्या समवेत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. परमजीत सिंह पटवालिया आणि सर्वोच्च न्यायालयातील सरकारी वकील अॅड. कटणेश्वरकर यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
शनिवार दि. २ फेब्रुवारी रोजी शासनाचे सचिव  शिवाजीराव दौड (सा. प्र. वि.) आणि राजेंद्र भागवत (विधि व न्याय विभाग) त्याचप्रमाणे, अॅड. सचिन पटवर्धन, अॅड. पिंगळे, महाधिवक्ता अॅड. कुंभकोणी यांचे सहाय्यक अॅड. अक्षय शिंदे, अॅड. थोरात यांचे दोन सहाय्यक अॅड. सुगधरे अॅड. प्राची तटके या सर्वांची नवी दिल्ली येथे अॅड. रोहतगी, अॅड. पटवालिया आणि अॅड. कटणेश्वरकर यांचे समवेत सुमारे ४ तास चर्चा झाली. या चर्चेत शासनाची भूमिका जाणून घेतली.
बुधवार दि. ६ फेब्रुवारी पासून सुरू होणार्‍या सुनावणीसाठी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. रोहतगी हे आदल्या दिवशीच मुंबईत येणार असून उच्च न्यायालयात शासनाची बाजू प्रभावीपणे मांडतील. त्यामुळे या प्रकरणी शासन कुठेही कमी पडत नाही याची सर्वांनी खात्री बाळगावी असे आवाहन चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल