सार्थ निवड ! समाजाप्रती संवेदनशील असलेल्या इंजि. माळेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा !! मा.राज्यपाल यांच्या आदेशाने उपयोजना नियोजन समितीपदी निवड !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

जिल्हा आदिवासी उपयोजना नियोजन समिती सदस्यपदी
इंजिनिअर विनायक माळेकर यांची निवड.

        नाशिक ::-जिल्हा आदिवासी उपयोजना नियोजन समिती सदस्यपदी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील युवा नेते इंजिनिअर विनायक माळेकर यांची  मा. राज्यपाल यांच्या आदेशाने निवड झाली आहे.

युवा नेते विनायक माळेकर यांच्या निवडीने त्र्यंबकेश्वर हरसूल येथील त्यांच्या समर्थकां मध्ये  उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
             नासिक जिल्हा परिषदेच्या हरसूल गटातून माळेकर यांच्या पत्नी प्रा. इंजि. सौ. रुपांजली माळेकर या अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या असून  त्यांच्या आई श्रीमती ताराबाई  माळेकर  या आदिवासी विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य संचालिका  सोबत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालिका म्हणून काम करत आहेत. तसेच विनायक  माळेकर हे महाराष्ट्र इंजिनिअर संघटनेचे  कोषाध्यक्ष आहेत.
          जिल्हा आदिवासी उपयोजना नियोजन समितीवर कामाची संधी दिल्याबद्दल माळेकर यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा , पालकमंत्री गिरीश महाजन, आम. बाळासाहेब सानप, भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांचे आभार मानले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल