जीएम पोर्टल शासकीय इ बाजारपेठ प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक::- महानगरपालिकेच्या वतीने महापालिकेतील कर्मचारी व अधिकारी यांचे साठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निर्देशानुसार जीएम पोर्टल शासकीय इ बाजारपेठ प्रणाली चे प्रशिक्षणाच्या बाबतीत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधनी संस्थेचे सहाय्यक संचालक बाबासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले. नाशिक महानगरपालिका मनपा, मुख्य मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील रेकॉर्ड हॉल येथे मनपा कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने खरेदी प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता यावी यासाठी जीएम पोर्टल विकसित केले आहे.वस्तू व सेवा सुविधा खरेदी / निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी या प्रणालीचा वापर शासन निर्देश प्रमाणे अनिवार्य असल्याने या संबंधी प्रशिक्षण आयोजित केले होते. याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी संस्था संस्थेचे सहाय्यक संचालक, महसूल विभागाचे बाबासाहेब शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या विषयातील अनेक मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. तसेच या पोर्टलमुळे शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये होणारी खरेदी प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व सुटसुटीत होऊन कमी कालावधीत ती प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होणार आहे, याबाबतचे सखोल मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. यावेळी बाबासाहेब शिंदे यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त (शहर व सेवा) हरिभाऊ फडोळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपायुक्त महेश बच्छाव हे व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यशाळेस मनपा अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोपीनाथ हिवाळे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा