१९ व्या स्थानावरून ९ व्या स्थानावर पोहचला रितेश ! स्कोर ट्रेंडस् इंडियाचा चार्ट !! खालील लिंकवर क्लिक करून वाचा दीनानाथजींचा न्यूज मसालाच्या वाचकांसाठीचा स्पेशल रिपोर्ट !!!

दीनानाथजी यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]

‘माऊली’ सिनेमामूळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ
         सध्या अभिनेता रितेश देशमुख आपली आगामी फिल्म माऊलीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. माऊली सिनेमाच्या प्रमोशनमूळे महाराष्ट्र दौरा केलेल्या रितेशच्या लोकप्रियतेतही चांगलीच वाढ झालेली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत रितेश देशमुख दहा स्थाने पूढे गेलेला आहे.
          माऊलीच्या प्रमोशनच्या सुरूवातीला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर रितेश १९ व्या स्थानावरून ९ व्या स्थानी पोहोचला आहे. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे  ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
        स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, "रितेशच्या वाढत्या लोकप्रियतेवरून दिसून येतं, की, देशभरात मराठी सिनेमा पाहणा-या दर्शकांमध्ये रितेश देशमुखचा मोठा चाहतावर्ग आहे. माऊली चित्रपटाच्या प्रमोशनमूळे सोशल, वायरल आणि डिजिटल प्लेटफार्मवर रितेशच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ दिसून आलीय."
        अश्वनी कौल सांगतात, "आम्ही १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !