अहिर सुवर्णकार समाजातर्फे वधू वरांना मदतीचा हात ! स्व. विजयकुमार पवार यांच्या कार्याचा गौरव संस्कार दिन म्हणून साजरा-श्याम बिरारी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

अहिर सुवर्णकार समाजातर्फे आर्थिक दुर्बल वधू-वरांना मदतीचा हात
      नाशिक : नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्थेच्या वतीने संस्थेचे  संस्थापक स्व. विजयकुमार पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त संस्कार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अहिर सुवर्णकार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
             अहिर सुवर्णकार संस्थेतर्फे दरवर्षी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. आपला संसार सुखाचा व्हावा, आपल्याला आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा, अशी सर्वांचीच इच्छा असते. मात्र, शिक्षित असूनही केवळ घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे समाजातील आर्थिक दुर्बल वधू-वरांना आपले स्वप्न साकारता येत नाही. अशा वधू-वरांना संस्थेतर्फे मदतीचा हात दिला जाणार असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष श्याम बिरारी यांनी व्यक्त केले. स्व. विजयकुमार पवार यांच्या स्मृतिदिनानिमित जैन गुरुकुल (वसतीगृह), मखमलाबाद आणि पेठ रोड येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वसतिगृहातील अनाथ मुलांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. अनाथ व इच्छुक मुलांच्या शिक्षणासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन, सामाजिक योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्याम बिरारी, कार्याध्यक्ष भगवंत दुसानीस, मेळावा प्रमुख चारुहास घोडके, रवींद्र जाधव, वसंत बाविस्कर, दंडगव्हाळ, प्रसन्ना इंदोरकर, सुरेश बागुल, प्रकाश थोरात, योगेश दुसानीस यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
           याप्रसंगी बोलताना श्याम बिरारी यांनी हरिओम संस्थेतर्फे दिनांक २३ डिसेंबर रोजी मुंबई नाका दादासाहेब गायकवाड सभागृहात घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्यात लग्न जुळलेल्या ज्या मुला-मुलींची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल, अशा वधुवरांचे लग्न संस्थेमार्फत नाशिक येथील अहिर सुवर्णकार समाजाच्या (सोनारवाडा) येथील कार्यालयात पार पाडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. विवाहासाठी आवश्यक मंगळसूत्र, कपडे, जेवण तसेच संसारोपयोगी पाच भांडी हा सर्व खर्च संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी पालकांनी त्यांच्या इच्छुक वधु-वरांची नावे मेळावा पदाधिकारी श्याम बिरारी, प्रसन्ना इंदोरकर व प्रकाश थोरात यांचेकडे नोंदवावीत असे आवाहन मेळावाप्रमुख चारुहास घोडके यांनी केले. या राज्यस्तरीय मेळाव्याचा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सदस्य संतोष सोनार, किरण दुसाने, योगेश दंडगव्हाळ, सुनील बाविस्कर, दिलीप दाभाडे, उल्हास वानखेडे आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !