कनिष्ठ सहाय्यकांची वेतनवाढ रोखण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक – महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमानुसार जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नियुक्त केलेल्या तारखेपासून दोन वर्षाच्या कालावधीत टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असताना जिल्हा परिषदेतील २४ कनिष्ठ सहायकानी अद्याप पर्यंत परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सदर न केल्याने त्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमानुसार जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपिक संवर्गातील कर्मचार्यांनी इंग्रजी व मराठी भाषेतील ३० शब्दाहून कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास कोणती कार्यवाही करावी याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश नाही. मात्र १९९९ मधील सामान्य प्रशासन विभागाच्या राजपत्राच्या नियमावलीनुसार मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखून धरण्याची तरतूद आहे. या नियमाचा आधार घेत सामान्य प्रशासन विभागाने विविध विभागात कार्यरत २४ वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याची कार्यवाही केली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी यास मान्यता दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा