जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य अधिकारी अँलन सी.वू (अँटलांटा) नासिक जिल्ह्यातील लसीकरण मोहीमेबाबत समाधानी ! मोहीमेत शिक्षण विभागालाही सहभागी करून घेण्याची डाँ. नरेश गितेंची सूचना !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

      नाशिक  - जिल्ह्यात सुरु असलेल्या गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधीने जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेबाबत समाधान व्यक्त करून या मोहिमेत आरोग्य विभागाबरोबरच शिक्षण विभागाची महत्वपूर्ण भूमिका असल्याने शिक्षण विभागाला मोहिमेत सहभागी करून घेण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडे केली.

(अँटलांटा) अमेरिका येथून जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य अधिकारी अँलन सी.वू  हे गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेबाबत माहिती घेण्यासाठी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी सुरगाणा येथील अतिदुर्गम भागातील शाळांना भेटी देवून लसीकरणाची माहिती घेतली. दुर्गम भागात मोहिमेस मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत तसेच सर्व विभागांच्या समन्वयाने करण्यात आलेल्या नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेत आज अँलन सी.वू यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेवून मोहिमेबाबत चर्चा केली अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. लसीकरणासाठी  शिक्षण विभागाची भूमिका महत्वाची असल्याने मोहिमेच्या सनियंत्रणासाठी त्यांना मोहिमेत सहभागी करून घेण्याची सूचना केली. नाशिक जिल्ह्याने या मोहिमेचा सूक्ष्म आराखडा तयार केला असून सर्व प्रमुख विभागांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. शिक्षण विभागास शाळानिहाय सनियंत्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून महिला व बाल विकास विभागालाही पुढील टप्प्यात अंगणवाडीमध्ये सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गट विकास अधिकाऱ्यांनीही तालुक्यातील शाळांना भेटी देवून येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी दिली. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण अधिकारी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी उपस्थित होते

गोवर रूबेला लसीकरण मोहिमेचा नियमित आढावा घेणार – डाँ.गिते

जिल्ह्यात सुरु असलेल्या गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेचा नियमित आढावा घेण्यात येत आहे. यासाठी पुढील आठवड्यापासून विडीओ कॉन्फरनद्वारे वैद्यकीय अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व पर्यवेक्षीय कर्मचारी यांचा आढावा घेण्यात येणार असून  वैद्यकीय अधिकारी यांचा प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आढावा घेण्यात येणार आहे. शिक्षण विभागातील गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचा आढावा घेण्यात येणार असून त्यांनी किती शाळांना भेटी दिल्या, किती ठिकाणी लसीकरण पूर्ण झाले याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्याने मोहीम पूर्ण होईपर्यंत सनियंत्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !