दुष्काळी परिस्थितीत थकीत वीज बीलामुळे बंद पडलेली ४२ गांव पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ नरेश गितेंनी बोलविलेल्या बैठकीतील चर्चेनंतर यशस्वीपणे सुरू !

नाशिक -  गेल्या दोन महिन्यापासून थकीत वीज बिल व नादुरुस्त केबलमुळे बंद
असलेली ४२ खेडी पाणी पुरवठा योजना अखेर शुक्रवारपासून (दि. ९) सुरु करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने जिल्हा पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीमधून १३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच वीज
वितरण विभागाने पिण्याच्या पाणी प्रश्नी संवेदनशीलता दाखविल्यामुळे योजना
कार्यान्वित करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे.
        ४२ खेडी पाणी पुरवठा योजनेंतर्गत नांदगाव व चांदवड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वीज बिलाची रक्कम वारंवार
थकीत राहत असल्याने ही योजना बंद पडत आहे. गेल्या दोन महिन्यापासून थकीत
बिलामुळे या योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. ऐन दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे ४० गावात पाण्याचा
प्रश्न निर्माण झाला होता. अनेक गावांमध्ये टॅकरद्वारे पाणीपुरवठा
करण्यात येत होता. ही योजना तत्काळ सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतही याबाबत चर्चा झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनीदेखील ग्रामीण पाणी पुरवठा
विभागाला योजना सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या
होत्या.
        याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी तत्काळ बैठक आयोजित केली होती यामध्ये वीज वितरण कंपनीचे अधिकारी व पाणी पुरवठा योजनेशी संबंधित सर्व यंत्रणांना बोलाविण्यात आले होते. डॉ. गिते
यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना चालू वीज बिल तसेच मागील थकीत बिलाही रक्कम कमी करून ११ लक्ष ८० हजार देयक भरून वीज जोडण्याची सूचना वीज वितरण विभागास केली होती. वीज वितरण विभागानेही पाण्यासारख्या संवेदनशील विषयाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने शुक्रवारपासून ही योजना पूर्ववत सुरु झाली आहे. नागसाक्या धरणातून सदरचा पाणीपुरवठा करण्यात येत
असून दुष्काळी परिस्थतीच्या पार्श्वभूमीवर योजना सुरु झाल्याने ४० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. योजना सुरु करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, वीज वितरण कंपनीचे अधिकारी श्री. ठोंबरे, श्री.दराडे यांनी विशेष प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।