लोकराजा दिवाळी अंकाचे उत्साहात प्रकाशन, जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे, डाँ. अनिरूद्घ धर्माधिकारी व नासिक कवीचे अध्यक्ष शरद पुराणिक यांच्या हस्ते प्राकाशन करण्यात आले, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
न्यूज मसाला च्या "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०१८ चे उत्साहात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यांत आले
जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शितलताई सांगळे, उत्तर महाराष्ट्रातील ख्यातनाम ह्रुदयरोग तज्ञ डाँ. अनिरूद्ध धर्माधिकारी व नासिक कवी चे अध्यक्ष शरद पुराणिक यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यांत आले.
दरवर्षी न्यूज मसाला च्या दिवाळी अंकाच्या मुखप्रुष्ठावर आजी माजी संसद सदस्याचे छायचित्र प्रकाशित करून त्या लोकप्रतिनिधीस "लोकराजा" म्हणून वाचकांसमोर आणले जाते, हे सातवे पुष्प मा. खास. हेमंत गोडसे यांचे छायाचित्र प्रकाशित करून गुंफण्यात आल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष शितलताई सांगळे यांनी आवर्जुन सांगीतले
दरवर्षीप्रमाणे याही वर्षाचा अंक दर्जेदार बनविला असुन मराठी वाचकांसाठी "लोकराजा" दिवाळी विशेषांक वाचकांची दिवाळी नक्कीच गोड करेल असे मनोगत डाँ. अनिरूद्ध धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरोग्यदूत तुषार जगताप यांनी केले, आलेल्या सर्व सन्माननीय व्यक्तींचे स्वागत व आभार न्यूज मसाला, नासिकचे संपादक नरेंद्र पाटील यांनी केले.
याप्रसंगी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर गोडसे, पत्रकार दिलीप सुर्यवंशी, मंगलसिंग राणे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, नितीन पवार, यशवंत ढिकले, भारती पवार, आंबेडकरीु चळवळीचे जेष्ठ नेते किशोर घाटे, संजय सानप,छावा क्रांतीवीरचे करन गायकर, सोमेश्वर संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब लांबे, नितीन सातपुते, आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
Keep it going Narendra Patil Sir
उत्तर द्याहटवाThnx
हटवा