एलइडी व्हँनचा शुभारंभ, गांवागांवात जाऊन करणार जनजाग्रुती ! शासनाकडून निवडलेल्या गांवात जाऊन या माध्यमाचा उपयोग करावा-शीतल सांगळे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक - राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छते विषयक जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात या एलईडी व्हॅनचा शुभारंभ आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या एल इ डि व्हॅन द्वारे स्वच्छतेविषयी गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे.
यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पगार, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ काळे, अशोक डोंगारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रदीप चौधरी, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंदे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना शितल सांगळे यांनी शासनाकडून निवडलेल्या सर्व गावात प्रभावीपणे या माध्यमाचा उपयोग करून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. या एलईडी व्हॅनच्या- माध्यमातून जिल्हास्तरावर शाश्वत स्वच्छता, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालयाचा वापर व स्वच्छता, व अन्य पाणी व स्वच्छता विषयाची ग्रामस्तरावर व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.
पाणी पुरवठा स्वच्छता विषयक संदेश प्रसारीत करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असून एलईडी व्हॅनच्या- माध्यमातून जिल्हयातील 150 पाणी व स्वच्छतेबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. नाशिक जिल्हयाला पाणी पुरवठा व स्वच्छता विषयाचे संदेश प्रसारित करण्यासाठी एलईडी व्हॅन मिळाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांचे मार्गदर्शनात तर पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांचे उपस्थितीत आज या एलईडी व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील 9 तालुक्यांमधील 150 गावांमध्ये एलईडी व्हॅनच्या माध्यमातून आजपासून गावागावांत जनजागृती करण्यात येणार आहे. याबाबत नियोजन करण्यात आले असून सर्व गट विकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी दिली. उद्घाटन प्रसंगी जिल्हा कक्षातील संदीप जाधव, रवी बाराथे, माधवी गांगुर्डे, भाग्यश्री बैरागी, सागर रोडे आदि उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा