नासिकचे सुनील वाजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील वाजे तर इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत सुनील वाजे यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून तर नाशिकच्या इगतपुरी तालुका अध्यक्ष पदी बाळासाहेब गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

          राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आ.छगनराव भुजबळ व प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजी (मामा) आव्हाड यांनी बाळासाहेब गाढवे यांना तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र दिले आहे. तर प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, आ.छगनराव भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी सुचविल्याप्रमाणे सुनील वाजे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. वाजे व गाढवे यांच्या नियुक्तीचे राजकीय वर्तुळातून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !