"मोठी तिची सावली" पुस्तकाची धोषणा ! गानसम्राज्ञीचे ९० व्या वर्षात पदार्पण !! २८ सप्टेंबरला लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्याबाबत, न्यूज मसालाच्या रसिकांसाठी खास दीनानाथजी यांचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

दीनानाथजी  [ मनोरंजन  प्रतिनिधी  ]       

लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणाचे औचित्य साधून मीनाताई मंगेशकर-खडीकर लिखित 'मोठी तिची सावली' पुस्तकाची घोषणा!

 

हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर,मीना मंगेशकर-खडीकर, प्रकाशक श्री. आप्पा परचुरे, अविनाश प्रभावळकर (अध्यक्ष-हृदयेश आर्ट्स) यांच्या उपस्थितीत प्रभुकुंज येथे 'हृदयेश आर्ट्स' तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लता मंगेशकर  यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणा निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित 'मोठी तिची सावली' या पुस्तकाची घोषणा करण्यात आली. मीना मंगेशकर-खडीकर यांनी ह्या पुस्तकाचे लेखन केलेले असून परचुरे प्रकाशन मंदिरातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.

करोडो लोकांच्या मनावर आपल्या सुमधूर आवाजाने मोहिनी घालणाऱ्या आणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान असणार्‍या महान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जीवन कथा सांगणारे मीना मंगेशकर-खडीकर लिखित व प्रकाशक श्री. आप्पा परचुरे प्रकाशित 'मोठी तिची सावली' हे पुस्तक लवकरचं आपल्या भेटीस येणार आहे. लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील अनेक मनोरंजक घटनांचा या पुस्तकात समावेश असणार आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहोळा २८ सप्टेंबर रोजी, लोकसभेच्या अध्यक्षा श्रीमती सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक मंत्री विनोद तावडे या सोहोळ्याचे मुख्य अतिथी असणार असून सोहोळ्याचे अध्यक्षस्थान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे भूषविणार आहेत. पं. शंकर अभ्यंकर ह्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असून आप्पा परचुरे आणि प्रवीण जोशी यांसमवेत  अनेक जण   उपस्थित  रहाणार  आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !