तरूणांनी रोजगारस्मार्ट होण्याची गरज-आयुक्त तुकाराम मुंढे , पारंपारिक शिक्षणासोबत कौशल्य असल्यास संवयंरोजगार प्राप्त करून यशस्वी व्हावे !! ६ व ७ सप्टेंबरच्या कार्यशाळेबाबत सविस्तर माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
स्मार्ट सिटीत कौशल्य घेऊन तरूणांनी रोजगार स्मार्ट होण्याची गरज
-आयुक्त तुकाराम मुढे यांची तरुणाईला साद
नासिक(५)::-पारंपारिक शिक्षणासोबत प्रत्येकाकडे कौशल्य असल्याच रोजगार किेंवा स्वयंरोजगार प्राप्त करता येईल. नाशिक शहर स्मार्ट होत असतांनाच येथील तरुणांचे जीवन स्मार्ट होणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीत तरुणांनी आपल्या आवडीचे क्षेत्रातील कौशल्य घेऊन रोजगार स्मार्ट होण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी “कौशल्य विकास कार्यशाळेच्या” उदघाटन प्रसंगी केले.
दिनांक 5 ते 7 सप्टेंबर 2018 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत दररोज महापालिका विभागनिहाय “कौशल्य विकास कार्यशाळा” कालिदास कलामंदीर येथे नाशिक स्मार्ट सिटी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांचे विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उदघाटन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नाशिक विभागाचे उपसंचालक सुनिल सैंदाणे, सहायक संचालक संपत चाटे यांचे हस्ते झाले.
नाशिक स्मार्ट सिटीच्या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत शहरातील 2000 तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले असुन यासाठी कोणते प्रशिक्षण आवश्यक आहे? याबाबत कल जाणून घेण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली असल्याचे आयुक्त यांनी सांगितले. या कार्यशाळेत नोंदणी फॉर्म भरुन घेतला जात असून यानंतर शास्त्रीय कलचाचणी करुन उमेदवारांचा कल व बलस्थाने पडताळून आवडी प्रमाणे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून पात्र, गरजू व गंभीर उमेदवारांचीच निवड करणार असल्याचेही आयुक्त यांनी उपस्थितांना सांगितले. जन्मत:च कोणामध्येही कौशल्य आपोआप येत नाही, तर प्रशिक्षण, प्रात्यक्षिक व कौशल्याचा वापर यामधून पारंगतता येत असते. कोणताही व्यवसाय वाईट नसुन त्यामध्ये अत्युच्य, गुणवत्ता व व्यावसायिकता विकसित केल्यासच यश प्राप्त होते. यातुनच समाजामध्ये स्थान निर्माण होते असे प्रतिपादन आयुक्त यांनी केले.
दिनांक 6 व 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 2 पर्यंत महाकवी कालिदास कलामंदीर येथे होत असलेल्या कौशल्य विकास कार्यशाळेस 18 ते 45 वषे वयोगटातील नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील उमेदवारांनी उपस्थित राहून रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी आणि या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त यांनी केले.
आज झालेल्या कार्यशाळेत रोजगार व स्वयंरोजगार विषयक कौशल्य प्रशिक्षण संधींचे मार्गदर्शन विविध तज्ञांनी केले. ट्रॅव्हल अँन्ड टुरिझम क्षेत्रातील संधीबाबत ईझी सोल्युशनचे सागर धर्माधिकारी, प्रॉडक्शन अँन्ड मॅन्युफॅक्च्युरिंग क्षेत्रातील सिएनसी ॲकॅडमीचे राजेंद्र बिरारी, ईलेक्ट्रीकल अँन्ड ईलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील इंडियन टेक्निकलचे दिपक नागमोती, कंन्सट्रक्शन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील नेक्स्ट एज्युकेशनच्या वैशाली जैन, ब्युटी अँन्ड वेलनेस क्षेत्रातील मोनालिसा ब्युटी पार्लरच्या जयश्री मुंडावरे आणि बिजनेस व कॉमर्स क्षेत्रातील डब्ल्यु एक्स कंन्सल्टंटच्या दिपाली चांडक यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यशाळेत उपस्थितांनी कौशल्य विकासाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना आयुक्त यांनी उत्तरे दिली.
या कार्यशाळेसाठी उपस्थितांचे आभार नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी व्यक्त केले, तर कार्यशाळेचे संचालन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंदाचे सहायक संचालक संपत चाटे यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटी, नाशिक महानगरपालिका एनयुएलएम विभाग आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंदाचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा