अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवान क्रुष्णांनी केले त्याच भूमिकेतून आधुनिक चालकांनी वाहन चालवावे-पोलीस उपायुक्त लक्ष्मिकांत पाटील !! महिंद्रा लाँजिस्टिक्सचा स्त्युत्य उपक्रम !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नासिक::- महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड, नाशिक यांच्या वतीने जागतिक चालक दिन (World Drivers Day)  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी महाभारताचा दाखला देत अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवान क्रुष्ण यांनी केले त्याचप्रमाणे आजचे चालकही क्रुष्णाच्या भूमिकेतून मी बघतो, मात्र आजचे चालक स्वत:च्या आरोग्याकडे दर्लक्ष करतांना दिसुन येतात, त्यानी वाहन चालविताना स्वत:बरोबरच आपल्या वाहनांतील इतऱ्यांच्याही जीवाचा विचार करावा, आधुनिक क्रुष्णाची भूमिका यशस्वीपणे साकारावी असे मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी वाहतुक शाखा सहाय्यक पोलिस उपायुक्त डॉ.अजय देवरे आणि पोलिस निरिक्षक श्री.लोहकरे यांनी चालकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात महिंद्रा
 लॉजिस्टिक्सच्या ५०० पेक्षा अधिक चालकांनी
 सहभाग घेतला. 
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिंद्रा लॉजिस्टिक्स चे प्रमुख श्री.निंबा भामरे आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !