फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक !!

नाशिक(15)::-फ्युचर मेकर कंपनीबाबत सध्या जे अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे ते पोकळ असून कंपनीचे सर्व व्यवहार लवकरच सुरू होण्याचा दावा कंपनीचे वितरक करत आहेत.

कंपनीविषयी देशभरांतील वितरकांकडून विश्वास व्यक्त केला जात असुन कुठल्याही प्रकारची तक्रार नसल्याचे सांगून ज्या व्यक्तीने सत्यता नसलेली खोटी तक्रार दाखल केली तो तक्रारदार आता समोर येत नसून लवकरच कंपनीचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत होत असल्याचे पत्रकार परिषदेत व्यावसायिक ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी, बापू ढोमसे यांनी सांगीतले.
वस्तू आधारीत (प्राडक्ट बेस) व साखळी पद्धतीच्या नियमांप्रमाणे कंपनी काम करत असुन कुठल्याही वितरकाने कंपनीच्या प्राडक्टची खरेदी केल्यानंतर ते प्राँडक्ट पसंत न पडल्यास तीस दिवसाच्या आत परत केल्यास कंपनीकडून स्वीकारण्यात आलेली रक्कम परत करण्यात येते यामुळे कोणताही वितरक स्वताहून जोडला जातो. जोडल्या गेलेल्या वितरकाने दिलेल्या रकमेचे प्राँडक्ट घेणे व वापरणे यांत कुठलाही गैरव्यवहार नसल्याचे बापू ढोमसे यांनी सांगीतले.
           काही कुटील प्रवृत्तीच्या स्पर्धक कंपन्यांनी हे षडयंत्र रचून कंपनीला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वितरकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन नॅशनल मोटिव्हेशनल ट्रेनर महेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.
         दरमहा कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेली फ्युचर मेकर ही आज मितीला देशातील प्रथम क्रमांकाची डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. विषमुक्त शेती, रोगमुक्त जीवन आणि हर घर रोजगार  हे ब्रीद घेऊन फ्युचर मेकर आपले काम जोमाने करत आहे. आजपर्यंत कंपनीने देशभरातील सुमारे १ कोटीहुन अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याच बरोबर फ्युचर मेकर अनेक असहाय्य गरजू लोकांसाठी मदर रसोई च्या नावाने अन्नछत्र चालवित आहे तसेच अनेक गोर-गरिब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी मदत करत आली आहे. त्याच बरोबर सातत्याने वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलनास ही हातभार लावत आहे.तसेच भारतीय सैनिकांसाठी नाशिकसह देशभर रक्तदान शिबिर घेण्यात आले
       असे असताना फ्युचर मेकरचा वाढता दबदबा स्पर्धक कंपन्यांना सहन न झाल्याने डायरेक्ट सेलिंग फेडरेशनच्या माध्यमातून कंपनीला बदनाम करण्याचा हा डाव कोर्टात योग्य पुराव्या अभावी निष्फळ ठरणार आहे असे मत पत्रकार परिषदेत बोलताना विषमुक्त शेतीचे एक्स्पर्ट बापू ढोमसे, डॉक्टर चौधरी व ओंटोलॉजी ट्रेनर समीर देसाई यांनी मांडले.
        कंपनीचे व्यवहार लवकरच पूर्ववत होतील. कंपनीने आजपर्यंत कुणाचेही देणे थकवलेले नसून अनेक जणांना मुदतीच्या आत त्यांची देणी अदा केलेली आहेत. नाशिकसह देशभरात कंपनीचे करोडो वितरक आहेत. विशेष म्हणजे कुठल्याही वितरकाची कंपनीबाबत काही तक्रार नाही. केवळ बदनामी ऐवजी अहोरात्र काम करणाऱ्या या सर्व लाखो वितरकांच्या हितासाठी कंपनीची सकारात्मक बाजू देखील लोकांसमोर मांडली जावी अशी अपेक्षा उपस्थित सर्व वितरक व्यक्त करीत आहेत असेही शेवटी त्यांनी सांगीतले.

टिप्पण्या

  1. I am proud to be the member of future maker jai future maker & our Respected CMD sir

    उत्तर द्याहटवा


  2. I am proud to be the member of FUTURE MAKER. JAI FUTURE MAKER & our Respected CMD MR.RADHESHYAMJI SIR.

    उत्तर द्याहटवा
  3. Future maker jivan ka aadhar
    Aur jine ka sahara h.
    Pani ke bina machli Future Maker ke bina networker ji nahi sakta
    ||| JAI FUTURE MAKER |||

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !