गुणवंत शिक्षक पुरस्काराने आज तीस शिक्षक गौरविले जाणार ! छायाचित्रात गुणवंत शिक्षकांची नांवे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

नाशिक: जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण आज सकाळी ११ वाजता परशुराम सायखेडकर सभागृहात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली.
                  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शितल सांगळे यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती यतींद्र पगार तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित, अर्थ व बांधकाम विभागाच्या सभापती मनिषा पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर, समाजकल्याण समिती सभापती सुनिता चारोस्कर, गटनेते धनराज महाले, डॉ. आत्माराम कुंभार्डे, यशवंत गवळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदि उपस्थित राहणार आहेत.  कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !