राज्यात प्रथम तर देशांत चाळीसावा क्रमांकावर नासिक जिल्हा ! मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पालकमंत्रांकडून कौतुक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक (५)::- प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांचे कौतुक करून जिल्हा परिषदेच्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच जिल्ह्याने शासनाकडे मागितलेले ३० हजार घरकुल अतिरिक्त उद्दिष्ट मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे तसेच शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही पालकमंत्री महाजन यांनी दिले. यामुळे २०२२ पर्यंत घरकुल मिळणाऱ्या लाभार्थ्यांस २०१८ मध्येच लाभ मिळणार असून पंतप्रधानांची महत्वाकांक्षा असलेल्या सर्वाना घरे उपलब्ध करून देण्याच्या योजनेला नाशिकमधून सुरवात होणार आहे.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत देशातील सर्वाना घर देण्याचे स्वप्न आहे. मात्र नाशिक जिल्हा येत्या डिसेंबर २०१८ पर्यंतच जिल्ह्यातील आवास योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषदेची ३० हजार घरकुल उदिष्ट पूर्ण करण्याची तयारी असल्याने यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून जिल्ह्याला अतिरिक्त उद्दिष्ट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
यासाठी जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेचे मोठ्या प्रमाणात काम सुरु असून या योजनेत नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तर चार महिन्यांपूर्वी देशात २२५ क्रमांकावर असलेला नाशिक जिल्हा आता ४० व्या क्रमांकावर पोहचला आहे.
४५० कोटी रुपये लागणार
नाशिक जिल्ह्याने ३० हजार घरकुलांच्या अतिरिक्त उद्दिष्टाची मागणी शासनाकडे केली आहे.. यासाठी ४५० कोटी रुपये लागणार आहेत. शासनाने उद्दिष्ट मंजूर केल्यास २०२२ पर्यंत घरकुलाची वाट बघणाऱ्या लाभार्थ्यांस २०१८ मध्येच घरकुलाचा लाभ होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी सांगितले. यासाठी ५५०० गवंडी प्रशिक्षण घेण्यात येणार असून यासाठी सर्व गट विकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. २०१८ पर्यत सर्व ३० हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची आपली तयारी असल्याचे डॉ गिते यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा