"लोकांचा पैसा लोकांच्या हितासाठी" हे ब्रीदवाक्य अंगीकारून भारतीय आयुर्विमा महामंडळाची घोडदौड ! आजपासुन एलआयसी सप्ताहाची सुरूवात !! विमाधारकांनी विविध सुविधांचा लाभ घ्यावा- गडपायले, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!
आज १ सप्टे. २०१८, भारतीय आयुर्विमा महामंडळाचा ६२ वा वर्धापन दिन ,
नासिक::- आज भारतीय आयुर्विमा महामंडळ आपला ६२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असुन १ ते ७ सप्टें. हा एलआयसी सप्ताह महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्ये साजरा केला जाणार आहे अशी माहीती नासिक विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक तुलसीदास गडपायले यांंनी काल पत्रकार परिषदेत दिली.
सप्ताहात कर्मचाऱ्यांसहीत विमा धारकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम, गरजूंना वस्तूंचे वाटप, व्रुक्षलागवड, आरोग्य शिबिर इ..
कोट्यावधी भारतीयांचा विश्वास संपादन केलेली देशातील क्रमांक एकची वित्तीय संस्था असा नांवलौकीक प्राप्त असलेले आयुर्विमा महामंडळ आहे, २९ प्रकारच्या योजना सोबत घेऊन समाजांतील विविध घटकांची विम्याची गरज पूर्ण करीत आहे, पेन्शन, आरोग्य, मुलांसाठीच्या योजना व युलिप योजनांसह उच्चभ्रु ग्राहकांसाठी "जीवन शिरोमणी" ही किमान एक कोटी विमा रक्कम असलेली योजना आहे, "प्रधानमंत्री वय वंदना योजना" ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ % सुनिश्तित दराने दरमहा दहा वर्षांसाठी निव्रुत्तीवेतन देणारी योजना सरकारने महामंडळावर राबविण्याची जबाबदारी दिलेली आहे.
महामंडळाचा कारभार मुंबई येथील केंद्रीय कार्यालयांतर्गत आठ क्षेत्रीय कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, २०४८ शाखा कार्यालये, १४०८ सँटेलाईट कार्यालये, व १२२७ छोट्या कार्यालयांद्वारे चालतो, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांच्या पश्चिम क्षेत्रातील नासिक हा अग्रगण्य विभाग गणला जात असुन यांत नासिक, धुळे, जळगांव व नंदुरबार या चार जिल्ह्यातील वीस शाखा व दहा सँटेलाईट कार्यालयांचा समावेश आहे.
आयुर्विमा व्यवसायातील ७६% पाँलीसी व ७०% हप्त्याच्या रकमेचा हिस्सा आपल्याकडे राखला असुन खासगी विमा कंपन्यांच्या दोन दशकाच्या स्पर्धेतील आपले स्थान व वर्चस्व अबाधित ठेवले आहे. हा भारतीय विमाधारकांनी महामंडळावर दाखविलेल्या विश्वासची साक्ष देणारा मुद्दा आहे.
"लोकांचा पैसा लोकांच्या हितासाठी" हे ब्रीदवाक्य अंगीकारून सामाजिक जाणीवेतून दहा वर्षापूर्वी गोल्डन ज्युबिली फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. याअंतर्गत ४४४ प्रकल्पांसाठी ९९.८४ कोटी रूपये प्रदान करण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या "स्वच्छ विद्यालय अभियान" माध्यमांतून ११३ विद्यालयांमध्ये १६९ शौचालये बांधण्यात आली. "विमा ग्राम" योजनेद्वारे ठराविक अटी पूर्ण करणाऱ्या गावांना सौर पथदीप, शौचालय, हातपंप, इ. सुविधा पुरविण्यात येतात, यांचबरोबर घरबांधणी, पाटबंधारे, रस्ते, रेल्वे, व दूरसंचार यांसारख्या पायाभूत सेवांमध्ये महामंडळाची गुंतवणूक मोठ्या प्रमाणांत आहे.
"एलआयसी दिनानिमित्त" सर्व विमाधारकांचे आभार व क्रुतज्ञता व्यक्त करीत वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक गडपायले यांनी शुभेच्छा दिल्यात व महामंडळाच्या ग्राहकाभिमुख योजनांचा-सुविधांचा लाभ घेत आयुष्याच्या विविध टप्प्यांवर लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयर्विम्याच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले,
सदर पत्रकार परिषदेस संबोधित करतांना नरेंद्र गिडकर, पुरूषोत्तम नागपुरे, प्रविण जोशी, पांडुरंग टोपले , पंढरीनाथ म्हस्के व प्रसिद्धी आणी सूत्रसंचालक डाँ.गोपाळ आवारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा