कोट्यावधी रूपयांचा निधी खर्च करूनही पाणीपुरवठा योजना पूर्ण होत नाही ! तीन वर्षापेक्षाही अधिक कालावधी उलटून ४१२ योजना रखडल्या !! २९ आँगस्टच्या आढावा बैठकीत संबंधितावर जबाबदारी निश्चित करणार !!! सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक  -   जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत जिल्ह्यातील ३ वर्षापासून अधिक कालावधी उलटूनही विविध कारणांमुळे रखडलेल्या ४१२ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले असून यासाठी पाणीपुरवठा योजना रखडण्याच्या कारणांना जबाबदार असलेल्या सर्व संबधितांना बोलावण्यात आले आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांचे काम करण्यात येत आहे. मात्र विविध कारणांमुळे जिल्ह्यातील ४१२ योजना ३ वर्षापेक्षा अधिका कालावधीपासून रखडल्या असून त्यांचे अंतिमीकरण झालेले नाही. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करता येत नाही.  गावातील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीमार्फत पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येते मात्र समितीमधील अंतर्गत वाद, हागणदारीमुक्त गावाची अट, ठेकेदाराने केलेले अपूर्ण बांधकाम आदि कारणांमुळे पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहत आहेत.  कोट्यावधीचा निधी देवूनही योजना रखडत असल्याने याबाबत सर्व संबधितांचा आढावा घेवून अपूर्ण कामाची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून  रखडलेली योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती डॉ नरेश गिते यांनी दिली.

या आढावा बैठकीसाठी गट विकास अधिकारी, उप अभियंता, शाखा अभियंता, संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे सचिव, योजनेसाठी नेमलेले मक्तेदार, तांत्रिक सल्लागार यांना बोलावण्यात आल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांनी दिली.
      
अ.क्र.      तालुका.     संख्या

१            सुरगाणा.     ६९

२            मालेगाव.     २९

३            बागलाण.     २०

४            कळवण.      ५१

५            दिंडोरी.        ३६

६            त्रंबक.          २२

७            पेठ.             १८

८           सिन्नर.          १६

९           नांदगाव.       २२

१०         इगतपुरी.      २४

११         चांदवड        १५

१२         येवला.         २६

१३         निफाड.       ३८

१४         देवळा.          ७

१५       नाशिक.         १९
     एकूण. -------------------- ४१२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !