प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर ! उपाध्यक्षपदी श्यामभाऊ जांभोलीकर व अजय गोवारी यांची नियुक्ती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

प्रहार जनशक्ती पक्षाची ठाणे जिल्हा कार्यकारिणी जाहीरः उपाध्यक्षपदी श्यामभाऊ जांबोलीकर.,अजय गवारी

ठाणे /प्रतिनिधी :आ.बच्चु कडु यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाची घोडदौड महाराष्ट्रभर सुरू असून ठाणे जिल्हा कार्यकारीणीचा विस्तार करण्यात आला आहे.बदलापूर येथील प्रहार जनशक्तीच्या कार्यालयात  पदाधिकारी निवड सभा दि. २२ आॕगस्ट रोजी पार पडली .
ठाणे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख  अशोक बहादरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ठाणे जिल्हाध्यक्ष संभाजीराव  जाधव यांनी विस्तारीत जिल्हा कार्यकारीणी जाहीर केली.आ.बच्चु कडू  यांच्या सुचनेनुसार जाहीर झालेल्या या ठाणे जिल्हा कार्यकारीणीत दोन उपाध्यक्ष असून या पदावर काम करून पक्ष विस्ताराची जबाबदारी श्यामभाऊ  जांंबोलीकर आणि अजय गवारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नव्याने जाहीर झालेल्या या कार्यकारीणीत ठाणे जिल्हा सचिव म्हणून संतोष हरावडे,सहसचिव दिपक साठे,रामचंद्र शहापूरे,जिल्हा संघटक सुरेश कदम,प्रसिध्दी प्रमुख जय चव्हाण,उल्हासनगर शहरसचिव म्हणून शरद घुडे,टिटवाळा शहर अध्यक्ष निर्भय सिंह यांना संधी देण्यात आली आहे.आ.बच्चु कडू, जिल्हा संपर्क प्रमुख अशोक बहादरे  जिल्हाध्यक्ष संभाजीराव  जाधव या पक्षश्रेष्ठींनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून गरजवंतांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे पक्षाचे धोरण तळागाळापर्यंत पोहचवू अशा भावना नवकार्यकारीणीने माध्यमांशी बोलतांना व्यक्त केल्या.
याप्रसंगी ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजीराव जाधव , ठाणे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख अशोक बहादरे , बदलापूर शहर अध्यक्ष ओमकार सुब्रमण्यम तसेच इतर उपस्थित  कार्यकर्त्यांनी  पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !