वाँक विथ कमीशनर कार्यक्रम सप्टेंबर नंतर पुन्हा सुरू होणार - आयुक्त ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

            नासिक (१२)::-महानगरपालीकेचे आयुक्त तुकाराम मुंढे नासिकला आल्यापासुन विविध उपक्रम राबवित आहेत त्यातीलच एक नावाजलेला उपक्रम "वाँक विथ कमीशनर".
दर शनिवारी सकाळी शहरांतील वेगवेगळ्या ठिकाणी नाशिक शहरांतील नागरिकांना भेटून त्यांना व शहरांतील जनतेस येणाऱ्या अडचणी समजून घेत त्या कमीतकमी कालावधीत सोडविण्यास प्राधान्य देत आहेत, या प्रशासनासाठी पथदर्शी ठरलेल्या उपक्रमाला पावसामुळे ब्रेक लागला असुन हा उपक्रम सप्टेंबर नंतर पुन्हा त्याच उत्साहाने सुरू होणार आहे. त्यासंबंधीच्या सूचना आज अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.नाशिक महानगरपालिकेच्या वतीने "वॉकविथ कमिशनर" "walk with commissioner" हा उपक्रम सप्टेंबर २०१८ पासुन पुनश्च: सुरू होऊन या कार्यक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्त श्री तुकाराम मुंढे अधिका-यांसह उपस्थित राहुन नागरिकांशी थेट सुसंवाद साधुन नागरिकांच्या तक्रारी/सुचना जाणुन घेणार आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !