शासनाकडून प्राप्त निधी नियोजनाची सोमवारी बैठक ! जिल्हा परिषद स्टेडीयम समितीची सभाही आयोजित- अध्यक्षा, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक (२५)::– जिल्हा परिषदेस  जिल्हा नियोजन मंडळाकडून व शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीच्या नियोजनाबाबत तसेच विविध कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी ३० जुलै रोजी बैठकीचे आयोजन केले आहे.                                  अध्यक्षीय दालनात दुपारी १ वाजता आयोजित या बैठकीत जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुखांना माहितीसह उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, विषय समित्यांचे सर्व सभापती, अति मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये विविध योजनांतर्गत मंजूर निधी, सन २०१७-१८ चे दायित्व, नियोजनासाठी आवश्यक निधी आदि विषयांवर तसेच विकासकामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषद स्टेडीयम समितीची सभाही ३० जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !