संभाजीराजे - दिलेर खान प्रकरणाचा पेच कसा सुटणार ? दीनानाथ यांजकडून खास प्रश्न !! उत्तर मिळणार झी मराठी वाहीनीकडून !! खालील लिंकवर क्लिक करा, उत्तर काय असेल ?????

दीनानाथ  यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]

संभाजीराजे - दिलेर खान प्रकरणाचा पेच कसा सुटणार?
           झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे. यात आता संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या एका प्रकरणाचा छडा लवकरच लागणार आहे. हे प्रकरण आहे संभाजीराजे आणि दिलेर खान...
          संभाजी महाराजांचं दिलेर खानाकडे जाणं याबाबत इतिहासकारांनी अनेक मतमतांतरं मांडली आहेत. वेगवेगळ्या नाटक, कादंबऱ्यांमधून वेगवेगळं चित्र रंगवण्यात आलं आहे. अनेकांना वाटतं की शिवाजी महाराजांवर चिडून संभाजीराजे गेले होते... काहींनी लिहिलंय की स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करायला गेले... मला इथे संधी मिळत नाही, तर तिथे जाऊन कर्तृत्व गाजवतो. एकूण संभाजीराजांचं बंड अशा पद्धतीने या घटनेकडे पाहिलं गेलं आहे. यामुळे त्यावेळी नेमकं काय घडलं याबाबत विविध विचार आहेत. असं असताना ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मध्ये काय दाखवलं जाणार याबाबत उत्सुकता वाढणं साहाजिक आहे.
           आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेच. तिथे नेमकं काय आहे? असं असताना खरा इतिहास टप्प्याटप्प्याने समोर आणणाऱ्या या मालिकेत हे प्रकरण कशा पद्धतीने दाखवण्यात येईल हे बघणं कुतूहलाचं ठरणार आहे.
        ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने नेहमीच समज-गैरसमजांच्या पलीकडे जाऊन नि:पक्षपातीपणे खरा इतिहास दाखवला आहे. मग ते गोदावरीचं प्रकरण असो, वा कलावंतीणीचं गाणं ऐकण्याचं... या सर्व गोष्टी मोठ्या शिताफीनं हाताळत खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून होतोय. ज्याला महाराष्ट्रातून सर्वमान्यता मिळतेय. भरभरून प्रेमही मिळतंय. 
        आता संभाजीराजे- दिलेर खान प्रकरण हा फार मोठा पेच मालिकेत आला आहे. हा पेच  आता कसा सुटणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. जुलै महिन्यात याचा उलगडा होणार असल्याने हा महिना प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचा आणि मालिकेसाठी कसोटीचा असणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !