राष्ट्रसंत भैय्युजी महाराज अस्थिकलश दर्शन व विसर्जन आज गोदातीरी झाले, यानिमित्त रामक्रुष्ण लहवितकर महाराजांचे प्रवचनातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली !!!!
नासिक(८ जुलै १८)::-आज प.पु.भैय्युजी महाराज यांच्या अस्थिविसर्जन व कलश दर्शन गोदावरीती करण्यात आले.
राष्ट्रसंत, सद्गुरू, प.पु.डाँ.भैय्युजी महाराज यांच्या आकस्मित निधनाने समाजमन हळहळले, धर्मक्षेत्र, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र असेल त्या सर्वांची मोठी हानी झाली असे हभप रामक्रुष्ण महाराज लहवितकर यांनी उपस्थितांना आपल्या किर्तनाच्या माध्यमांतून समजावून दिले, आज अस्थिकलश दर्शन व विसर्जन निमित्त किर्तन प्रवचन आयोजित केले होते, नासिक शहर व जिल्हा सर्वोदय परिवार , छावा क्रांतीवीर सेना यांनी या प्रवचनाचे आयोजन करून प्रवचनातून अध्यात्म, जीव व परमात्मा, म्रुत्यु व म्रुत्यु पश्चातील जीवन याचबरोबर भैय्युजी महाराजांचाही परिचय करून दिला.
महाराजांचा मानवता धर्म हा आजही त्यांच्या आत्मारूपी वावराने आपल्या पाठीशी सदैव राहील कारण ते समाजासाठी झटलेत, समाजाला दिशा देणारे राष्ट्रसंत होते, संतांचे निर्माण व त्यांचे जीवन मानवी जीवनातील वास्तव्य हे आत्मारूपाने कायम असते.
यानंतर नासिक तसेच इतर ठिकाणांहून अस्थिकलश दर्शनाला आलेले धार्मिक, राजकीय , सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा