भूकंपप्रवण क्षेत्रास भेट देण्यात प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता ! खासदारांनी केली नाराजी व्यक्त !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

पेठ तालुक्यातील गोंदे, निरगुडे, भायगाव, आड, उस्तळे, या परिसरात दहा जुलै रोजी २.७ रिष्टर स्केलचा भुकंप झाला १९९५ पासून  ८२ वेळा भुकंपाचे धक्के बसले परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही तेथे आज खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी भेट दिली व या धक्का दायक बाबीकडे दुरदर्शन, वर्तमानपत्रात बातमी आली,तरी साधा प्रशासनांतील तलाठी सुध्दा तेथे जाऊन चौकशी करण्याची तसदी घेतली नाही, बाकी मोठे आधिकारी तर लांबची बाब अशा शब्दात तीव्र नापसंती व्यक्त केली. याबाबत तहसीलदार, पोलीस यंत्रणेने तेथील पोलीस पाटील सरपंच यांनी लेखी कळवल्या नंतर जाणे क्रमप्राप्त असतांनाही या ठिकाणास भेट देण्याचे औदार्य दाखविले जाऊ नये हि प्रशासनाची उदासीनतेला उत्तर म्हणून खासदारानी भेट दिली, सोबत प्रशांत भदाणे, रघुनाथ चौधरी,  बापु पाटील.भाऊ माळगावे, गणपत चौधरी,  कांतीलाल राऊत, यशवंत खंबाईत, संपत भोंडवे, तसेच गोंदे.निरगुडे .भायगाव येथील सरपंच व पोलीस पाटील हजर होते....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !