"परी हूँ मैं" ७ सपप्टेंबर ला सुरू होतेय ग्लँमरस दुनियेची सफर ! सविस्तर माहीतीसाठी दीनानाथ यांजकडून न्यूज मसालाच्या रसिकांसाठी, लिंक क्लिक करा !!!
दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]
ग्लॅमरस दुनियेची सफर ‘परी हुँ मैं’ या मराठी चित्रपटातून घडणार
७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महराष्ट्रात होणार प्रदर्शित
गाजलेल्या ‘वेगे वेगे धावू’
एकांकिकेवर आधारित
टीव्हीच्या स्मॉल स्क्रीनमध्ये मोठी ताकद आहे, या छोट्या पडद्याने आपल्या घराचा ताबा कधी मिळविला हे आपल्या ध्यानातही आले नाही. मोठ्या कलाकारांसह लहान मुलांना नवी ओळख देणाऱ्या या छोट्या पडद्याचं विश्वच निराळं आहे. टिव्ही जगताच्या ग्लॅमरस आणि टीआरपीच्या विश्वाची सफर घडवणारा ‘‘परी हुँ मैं’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि योगायतन फिल्मस निर्मित ‘परी हुँ मैं’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. राजेंद्र प्रताप सिंग आणि शिला सिंग यांनी केली असून संजय गुजर हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत तर रोहित दास शिलवंत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
लहान मुले टार्गेट ठेउन टीव्हीवर अनेक कार्यक्रम होतात, चंदेरी दुनियेचा हाच विषय लेखिका इरावती कर्णिक यांनी ‘वेगे वेगे धावू’ या एकांकिकेमधून मांडला होता, त्यावर आधारीत हा चित्रपट आहे. आधी एकांकिका, मग दीर्घांक म्हणूनही याचे सादरीकरण झाले असून त्याचे दिग्दर्शनही रोहित दास शिलवंत यांनीच केले होते.
अभिनेते नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘परी हुँ मैं’ या चित्रपटाची पटकथा मच्छिंद्र बुगडे, रोहित दास शिलवंत आणि संकेत माने यांची असून संवाद योगेश मार्कंडे यांचे आहेत. अभिषेक खणकर आणि सचिन पाठक यांच्या गीतांना संगीतकार समीर सप्तीसकर यांनी स्वरबद्ध केले तर शंकर महादेवन, अमृता फडणवीस, जिया वाडकर आणि मंदार पिलवळकर यांचा आवाज गीतांना लाभला आहे. चित्रपटाला पार्श्वसंगीत अनुराग गोडबोले यांनी दिले आहे, तर संकलन नितीन राठोड, कलादिग्दर्शन नरेंद्र भगत, डीओपी रोहन मडकइकर आणि प्रोजेक्ट हेड भूषण सावळे, हर्षदा सावे आहेत. अत्यंत हटके विषयामुळे चर्चेत असलेला ‘परी हुँमैं’ येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा