"परफ्युम" चं टिजर पोस्टर सोशल मिडीयाद्वारे लाँच !! या चित्रपटातून तरूणांच्या मानसिकतेचे पदर उलगडणार काय ? एक ऊत्सुकता सर्वांना,,,,,,,!! दीनानाथ यांजकडून खास न्यूज मसालाच्या रसिकांसाठी !! खालील लिंकवर क्लिक करा व वाचा सविस्तर !!

दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]

'परफ्युम'चं टीजर पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच
             परफ्युम असं सुवासिक नाव असलेल्या चित्रपटाची चित्रपटसृष्टीत चर्चा आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. चित्रपटाच्या नावासारखंच हे पोस्टरही व्हायब्रंट आहे.
              सायकलवर बसून एकमेकांच्या हातात हात असलेलं कपल या पोस्टरमध्ये दिसत आहे. रंगांची मुक्त उधळण असलेल्या या पोस्टरमधून चित्रपटाची कथा ही विविधरंगी आहे, हे व्यक्त होतं. त्यामुळे प्रेमाचे, नात्यांचे, तरुणाईच्या मानसिकतेचे पदर उलगडून दाखवणाऱ्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल ही जोडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. 
                “हलाल”सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या, तसेच आगामी “लेथ जोशी” चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे स्टुडिओजचे अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनीच “परफ्युम”ची प्रस्तुती केली आहे तर एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे  
           दिग्दर्शक आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले आहे. ओंकार आणि मोनालिसासह अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे असे उत्तम आणि अनुभवी कलाकारही या चित्रपटात आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !