शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालखी सोहळा नियोजन समन्वय समिती स्थापन करा-संजय धोंडगे, अध्यक्ष , संतश्रेष्ठ निव्रुत्तीनाथ समाधी संस्थान !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !
पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी समन्वय समिती स्थापन करा : संजयनाना धोंडगे
पंढरपूर दि २० - महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या संतांच्या पालखी सोहळ्यांना विज , पाणी , रस्ते , आरोग्य , रॉकेल , गॅस , दर्शन पास , सुरक्षा या व अशा अनेक अडीअडचणीना तोंड द्यावे लागते . त्या अडचणी निवारण करण्यासाठी तसेच या प्रमुख पालखी सोहळ्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील प्रमुख सात पालखी सोहळ्यांची समन्वय समिती स्थापन करावी अशी मागणी श्री संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष ह भ प संजयनाना धोंडगे यांनी केली .
श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या संत तुकाराम भवन मध्ये राज्यातील सहा पालखी सोहळा प्रमुखांची बैठक पार पडली . या बैठकीस श्री विठठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य ह भ प शिवाजी महाराज मोरे ,राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे , संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह भ प बाळासाहेब मोरे , संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष ह भ प संजयनाना धोंडगे , सचिव पवनकुमार भुतडा , संत सोपानकाका पालखी सोहळा प्रमुख श्रीकांत चिंतामणी , प्रमुख विश्वस्थ गोपाळ गोसावी ,संत मुक्ताबाई संस्थानचे व्यवस्थापक शशिकांत पाटील यांच्यासह दिंडी प्रमुख उपस्थित होते .
संजयनाना धोंडगे म्हणाले संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळे मोठे असल्याने त्यांच्याकडे शासनाचे लक्ष असते . परंतु इतर पालखी सोहळ्यातही दिंड्यांची संख्या वाढली आहे . लाखोचा जनसमुदाय या सोहळ्यांबरोबर चालत असतो . त्यांना शासन सुविधा देणार की नाही . संत निवृत्तीनाथांचा सोहळा नाशिक , नगर व सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करतो . या तीन जिल्हा प्रमुखांची बैठक घेवून या पालखी सोहळ्याला सुविधा देण्यास सांगणे गरजेचे आहे . संत मुक्ताई व संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याना इतर सुविधा तर सोडाच साधे पाण्याचे टॅंकरही मिळत नाहीत . महाराष्ट्र शासनाने या पालखी सोहळ्यांकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले .
संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे प्रमुख श्रीकांत गोसावी म्हणाले , शासन संतामध्ये भेद करीत आहे . सोपानदेवांचा सोहळा आता सव्वालाखापर्यंत पोहचला आहे . या सोहळ्याला शासनाने सुविधा द्यावी .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा