९८ व्या नाट्य संमेलनातील एक परिसंवाद " सांस्कृतिक आबादुबी " !! सविस्तर वृत्तांतासाठी खालील लिंकवर क्लिक करा ,,,,
दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी
मुंबई::-९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुलुंडला मोठ्या उत्साहाने साजरे झाले, यामध्ये विविध कार्यक्रमाची रेलचेल होती, रसिक प्रेक्षकांनी सर्वच कार्यक्रमाचा आस्वाद मनमुरादपणे अनुभवला, या संमेलनात " सांस्कृतिक आबादुबी " हा परिसंवाद डॉ हेमू अधिकारी रंगमंच ह्या ठिकाणी आयोजित केला होता, ह्या मध्ये डॉ जब्बार पटेल, प्रतिमा कुलकर्णी,पुरुषोत्तम बेर्डे, अद्वैत दादरकर, प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, देवेंद्र पेम,प्राजक्त देशमुख, संतोष पवार, प्रताप फड,केदार शिंदे, यांचा सहभाग होता या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जितेंद्र जोशी ऋषिकेश जोशी यांनी केलं होते, त्यांनी कलाकार दिगदर्शक यांना विविध प्रश्न विचारून बोलते केलं आणि हळूहळू हा सांस्कृतिक आबादुबी चा परिसंवाद रंगायला सुरवात झाली, या मध्ये डॉ जब्बार पटेल म्हणाले, मला जी नाटके पटतात ते मी करतो, ह्यावेळी त्यांनी घाशीराम कोतवाल विषयीच्या आठवणी सांगितल्या, आणि आता एखादे नाटक करण्याचा विचार आहे असेहि ते म्हणाले.देवेंद्र पेम म्हणाले कि मला विनोदी नाटके करण्याची आवड होती त्यामुळे अधिकाधिक विनोदी नाटके केली त्याच्या तालमी गिरगावमध्ये जिथे आम्ही राहत होतो त्याठिकाणी तेथील बिल्डिंगच्या गच्चीवर केला, नाटकाचा विषय हा विनोदी अंगाने मांडला गेला कि तो प्रेक्षकांना अधिक रुचतो. केदार शिंदे यांनी आपल्या आजोबांचे अर्थात शाहीर साबळे यांचे उदाहरण देऊन सांगितले कि मला विनोदी नाटके करायला आवडतात त्यामुळे विनोदी नाटके सादर केली त्यामुळे गंभीर निर्माते हे हसायला लागले, हे नाटकाचे यश आहे. संतोष पवार म्हणाला आम्हाला विचारता कि विनोदी नाटके का करता पण गंभीर नाटके करणाऱ्यांना विचारा कि तुम्ही विनोदी नाटके का करीत नाही. प्रतिमा कुलकर्णी म्हणते कि प्रेक्षकांनी नाटक जर गांभीर्याने घ्यायला हवे असेल तर कलाकार मंडळींनी आपले काम गंभीरपणे सादर करायला हवे.प्रियदर्शन जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं कि, नाटक हे नटाचे माध्यम आहे. लेखकांनी लिहिलेलं नाटक दिगदर्शकानी बसवलं कि त्यानंतर ते नाटक एकदा पडदा उघडला कि ते नाटक फक्त नटाचं होऊन जातं , मी मला नाटक भावलं तस नाटक केलं, गंभीर / विनोदी नाटक असे वेगळेपण केलं नाही, हे सांगताना ते म्हणाले कि आपलीच माणसे आपलं नाटक पाहायला येत नाहीत.पुरुषोत्तम बेर्डे यांनी आपले अनुभव सांगितल्यावर, ते म्हणाले कि, मी टूरटूर ह्या नाटकानंतर एक नाटक केलं त्यामध्ये नामवंत कलाकार होते, संगीत / नेपथ्य सर्वच उत्तम होतं, पण ते नाटक चाललं नाही, प्रेक्षकांची मानसिकता आपण जाणून घ्यायला पाहिजे, नाटकाचे व्यवस्थापन / मार्केटिंग करणे हे गरजेचं आहे. चिन्मय मांडलेकर म्हणाला मी फक्त व्यावसायिक नाटक करणार,, त्या नाटकांनी जो कोणी निर्माता असेल त्याला पैसे परत मिळवून दिले पाहिजेत. अद्वैत दादरकर म्हणाला, आपण एक चांगलं नाटक करूया, नाटक समकालीन वाटलं पाहिजे, नाटकाचे कास्टिंग हे निर्माता करतो, त्यांना जे जे हवे ते कलाकार घेतात त्यांच्या पसंतीचे घेतलेल्या कलाकारांना घेऊन नाटक करावे लागते, नाटकाचे कास्टिंग जर व्यवस्थित झाले नाही तर नाटकावर परिणाम होतो. प्राजक्त देशमुख यांनी देवबाभळीच्या आठवणी सांगितल्या आणि म्हणाले कि मला फक्त केवळ नाटकच करायचं होते ते कोणत्या पठडीतलं आहे असा शिक्का लावलेला नव्हता, अभिवाचन करून नाटकांचे स्वरूप कळते, यापुढे मला चांगली गोष्ट असणारी नाटके करायची आहेत, प्रताप फड म्हणाले, मी व्यावसायिक नाटकाच्या गणिताच्या ताळमेळात अडकलो होतो,आम्हाला काहीच कळत नाही असे अनेकांना वाटत असते, वडिलांच्या कडून एक चांगला सल्ला मिळाला होता ते म्हणाले कि जे करशील ते मनापासून कर,अनन्याच्या एकांकिके नंतर मला निर्माते मोहन वाघ यांच्या कडून ऑफर आली होती पण त्यावेळी योग आला नाही.
असा हा " सांस्कृतिक आबादुबी " चा परिसंवाद झाला पण काही प्रमाणात रंगला काही प्रमाणात प्रेक्षकांची पकड घेऊ शकला नाही,,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा