पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अजित ताडगे, उपाध्यक्षपदी संजय हेंडगे यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
पंडित दीनदयाळ उपाध्याय ना.स.पतसंस्था चेअरमनपदी अजित ताडगे,व्हा.चेअरमन संजय हेंगडे यांची निवड.
नासिक(२८)::-मखमलाबाद येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन निवडणूक प्राधिकरण व सहकार विभागाच्या अधिकारी श्रीमती.एस.पी.शिंदे यांनी कामकाज पाहिले.सदर पतसंस्थेची संचालक मंडळ निवडणूक दि.४ जुन रोजी बिनविरोध झाली होती.चेअरमन,व्हा. चेअरमन निवडणूक कार्यक्रम दि.२८ जुन रोजी जाहिर केला होता. त्यानुसार चेअरमन म्हणुन अजित ताडगे यांचा एकमेव अर्ज होता.त्यास सुचक म्हणुन यशवंत ग पिंगळे तर अनुमोदक चित्रा तांदळे हे होते. त्यानुसार निवडणूक अधिकारी श्रीमती एस.पी.शिंदे यांनी अजित ताडगे यांची चेअरमन तर संजय हेंगडे यांची व्हा.चेअरमन म्हणुन निवड झाल्याचे जाहिर केले.मा.का.संचालक म्हणुन खंडेराव आव्हाड, जनसंपर्क संचालक राजेंद्र बोराडे, संचालक अमित घुगे, अवधुत गायकवाड,यशवंत ग पिंगळे, कैलास वा काकड, शांताराम साळवे,चित्रा तांदळे,लता केदार यांची निवड झाली. संस्थेच्या आजमितीस ६७ लाख ४१ हजार ठेवी आहेत.संस्थेने विज बिल भरणा केंद्र सुरु केले असुन ठेवीदार व खातेदारांना घरपोच सेवा देण्याचे संस्थेचे चेअरमन अजित ताडगे यांनी सांगितले. संस्थेने अल्पबचत प्रतिनिधीद्वारे परिसरातील छोटे मोठे व्यावसायिकाबरोबर संपर्क वाढविला असुन भविष्यात ठेवीवाढ करणे व गरजु,उपेक्षिताना अर्थसहाय्य करणे यावर भर देणार असल्याचे संस्थेचे संस्थापक सुनील केदार यांनी सांगितले. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एस.पी.शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले व पतसंस्थेच्या पुढील कामकाजास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक मंडळ वकील अशोकराव घुगे,लेखापरीक्षक संतोष कासार, डॉ.साहेबराव क्षिरसागर, प्रकाश आवटे, डॉ. सावजी गोराडे, संस्थापक सुनील केदार, श्रीमती एस.पी.शिंदे, चेअरमन अजित ताडगे,व्हा.चेअरमन संजय हेंगडे, मा.का.संचालक खंडेराव आव्हाड, जनसंपर्क संचालक राजेंद्र बोराडे, संचालक अमित घुगे, अवधुत गायकवाड, यशवंत ग पिंगळे, कैलास वा काकड, शांताराम साळवे,चित्रा तांदळे,लता केदार,शिरीष जोंधळे, संभाजी पवार,लक्ष्मण खाने, मनिषा सोनवणे आदी उपस्थित होते. आभार कार्यलक्षी संचालक संभाजी पवार यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा