जिल्हा पत्रकार संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली ! जिल्हाध्यक्षपदी यशवंत पवार, प्रसिद्धिप्रमुखपदी न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील व सुभाष सुर्यवंशी यांची नियुक्ती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

नासिक::-जिल्हा पत्रकार संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.
     काल शासकिय विश्रामग्रुहावर नियोजित निवडणुक पार पडली, निवडणुक बिनविरोध पार पाडण्यासाठी सर्व उमेदवारांनी सर्वानुमते  संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांना अधिकार दिले होते, त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन  उमेदवारांच्या माघारीपासुन ते बिनविरोध निकालापर्यंत परिश्रम घेतले. या निवडणुकीत जिल्हाध्यक्षपदासाठीच्या जागेसाठी यशवंत पवार यांचा एकमेव अर्ज असल्याने तसेच सर्व जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहील्याने सर्व उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अँड.रामनाथ शिंदे यांनी घोषित केले.
परिषद सदस्यपदी  वडनेरे,प्रसिद्धी प्रमुखपदी न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील व सुभाष सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली.
इतर कार्यकारिणी खालीलप्रमाणे नांव व कंसात पद यानुसार-----
सी.पी.शिंपी (उपाध्यक्ष), के.आर.आवटे (सरचिटणीस), व्ही.बी.बोराडे(खजिनदार), एस.एस.गोडसे(सहसरचिटणीस), एम.डी.देवरे(सहसरचिटणीस), बी.एस.आहेर(सहखजिनदार), आर.व्ही.उगले(सहखजिनदार), ए.बी.आव्हाड(संघटक), के.आर.हांडे(सहसंघटक), अँड.एस.बी.देसाई(कायदेशीर सल्लागार), डी.बी.ठोंबरे(का.सदस्य), बी.आर.कुडके(का.सदस्य), एस.एल.निकम(का.सदस्य), एस.पी.मालुंजकर(का.सदस्य), पी.बी.दंडगव्हाळ(का.सदस्य), आर.आर.देसले(का.सदस्य), एस.के.खैरनार(का.सदस्य), व्ही.एन.माळी(का.सदस्य).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !