सावरगांव प्रकरणांत निव्रुत्तीनाथ संस्थान विश्वस्त मंडळाकडे सदर विश्वस्ताचा माफीनामा सादर ! आषाडी यात्रेचे नियोजनासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
त्र्यंबकेश्वर (२०)::-निव्रुत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्तांनी आजच्या बैठकित १६ तारखेला सावरगांव येथे घडलेल्या प्रकारावर पांघरून घालत विषय मार्गी लावून संस्थानचे भविष्यात होऊ घातलेल्या नुकसानीस थांबविण्यात यश मिळविले आहे, संबधित विश्वस्त या बाबीमुळे अभिनंदनास पात्र आहेत.
सावरगांव येथील प्रतिष्ठित-दानशूर व गेल्या चाळीस वर्षापासुन वारकरी पंथाची पताका खांद्यावर मिरविणारे बाबाजी पाटील-कुशारे व संस्थानचे विश्वस्त, आश्रम निर्माते, ब्रम्हचारी पंडीत महाराज कोल्हे यांची अकरा हजार रूपयांच्या देणगीवरून खडाजंगी झाली होती, मात्र दोन्ही पक्षांनी व संस्थानच्या विश्वस्त मंडळाने सामंजस्याची भूमिका घेत झालेला कथित प्रकार हा गैरसमजुतीतुन झाला होता. यापुढे असा प्रकार कुणाकडूनही घडू नये याची खबरदारी घेत पंडीत कोल्हे यांच्याकडून माफीनामा लिहून घेत व तो मंजूर करत हा विषय आजच्या बैठकित संपवून संतश्रेष्ठ निव्रुत्तीनाथ संस्थानच्या होणाऱ्या बदनामीकारक नुकसानीतून सावरले, याचे श्रेय अध्यक्ष संजय धोंगडे, सचिव पवन भुतडा, त्र्यंबक गायकवाड, पुंडलिक थेटे, जयंत गोसावी,यांना जाते , त्यांना इतर विश्वस्तांनीही तितक्याच समजदारीने पाठींबा दिला.
सालाबादाप्रमाणे निघणारी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आषाडी यात्रा दि २८ जून रोजी प्रस्थान करीत आहे. यांवेळी संप्रदायातील वारकरी व ग्रामस्थ यांनी हजर राहण्याबद्दल यात्रा सोहळ्याचे अध्यक्ष पंडीत कोल्हे यांनी पत्रक प्रसिद्धिस देऊन आवाहन केले. सदर यात्रेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, संस्थानच्या मालकीचे जुने, वापरता न येणारे लाकुड लिलाव पद्धतीने ३ लाख ४१ हजाराला देण्यात आले असुन संस्थानाच्या तिजोरीत भर टाकण्याबरोबर संस्थानाच्या हिताचे व विकासासाठीचे निर्णय घेण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा