जिल्ह्यातील एकही मुल कुपोषित व ग्राम बाल विकास केंद्रातील आहार तसेच उपचारापासुन वंचित राहणार नाही-अनिल लांडगे. सहाय्यक प्रशासनाधिकाऱ्यास सेवानिव्रुत्तीच्या दिवशीच निव्रुत्तीवेतन दाखला सुपूर्त !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक(३०)::- जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ नरेश गिते यांनी जिल्ह्यात जोरदार काम सुरु केले आहे. महिला व बालविकास. आरोग्य व ग्रामपंचायत विभाग यासाठी एकत्रितपणे काम करीत आहेत. जिल्ह्यातील एकही मुल कुपोषित राहणार नाही व ग्राम बाल विकास केंद्रातून आहार व उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे व आवश्यक तेथे गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामसेवक यांनी पुन्हा पुन्हा सर्वेक्षण करून कुपोषित बालक शोधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी केले.
नाशिक व दिंडोरी तालुक्याची एकत्रित आढावा बैठक आज महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सभागृहात जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ डेकाटे , सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी दत्तात्रय मुंडे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी ईशाधिन शेळकंदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ गर्जे आदि उपस्थित होते.
यावेळी अनिल लांडगे यांनी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेताना अधिकारी व कर्मचार्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. पिण्याच्या पाण्याचा आढावा घेताना अनिल लांडगे यांनी सर्व पाण्याच्या स्त्रोताचे शुद्धीकरण करून पावसाळ्यात एकाही गावात साथ उद्भवणार नाही यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडीचा आढावा घेताना अपूर्ण अंगणवाडी बांधकामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले. धोकादायक व नादुरस्त अंगणवाडीत बालकांना न बसविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सुरुवातीला महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी कुपोषण निर्मुलनासाठी ग्राम स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल विकास केंद्राबाबत आढावा घेण्यात आला. आरोग्य व आहार संहितेनुसार आहार व औषध देण्यात येत आहेत कि नाही याबाबत सर्व संबंधितांकडून माहिती घेण्यात आली. दिंडोरी तालुक्यात पुन्हा सर्वेक्षण करून सर्व तालुका व ग्राम स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांनी ग्राम बाल विकास केंद्रांना नियमित भेटी देण्याचे आदेश दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ डेकाटे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेताना दुषित पाण्याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी दुषित पाणी नमुने, टीसीएल तपासणी याबाबत सविस्तर आढावा घेतला. शौचालय वापराबाबत प्रत्येक गावात जनजागृती करून हागणदारीमुक्त गावाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावे व या कामात सातत्य ठेवण्याचे निर्देश दिले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला. नाशिक तालुक्याने घरकुल कामात प्रगती केली असून राज्यात पहिल्या दहामध्ये नाशिक तालुका असल्याबाबत तालुक्याचे अभिनंदन केले. तसेच नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून अपूर्ण घरकुल ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे व सन २०१८-१९ चे उद्दिष्टही विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी सिंचन विहिर, पाणी पुरवठा योजना, ग्राप मधील जन सुविधेचे कामे, घरकुल इ योजनाची अपूर्ण बांधकामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश अनिल लांडगे यांनी दिले.
सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी प्रशासकीय बाबींचा आढावा घेतला. नाशिक पंचायत समितीतील सहायक प्रशासन अधिकारी आज सेवानिवृत्त झाल्याने त्यांना आजच पेन्शन दाखला देण्यात आला. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी पाणी पुरवठा योजनाचा आढावा घेताना अपूर्ण योजना त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य लेख व वित्त अधिकारी बोधीकीरण सोनकांबळे, समाजकल्याण विभागाचे निलेश पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ साळवे, नाशिक तालुक्याचे गट विकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, दिंडोरीचे गट विकास अधिकारी भूपेंद्र बेडसे, जिल्हा व तालुका स्तरावरील खातेप्रमुख, तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा