महाराष्ट्रातील पोट खराबा जमीनींचे शुल्क भरून लागवडीसाठी ग्राह्य धरण्याच्या मागणीला यश-छावा क्रांतीवीर सेना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

    पोट खराबा प्रश्न लागला मार्गी.छावा क्रांतिवीर सेनेच्या पाठपुराव्याला आले यश.
       नासिक::- १५ जुलै पासून जिल्हाधिकारी यांच्या कडे प्रस्ताव सादर करून नियमानुसार शुल्क भरून पोट खराबा जमिनी आता लागवडीसाठी योग्य ग्राह्य धरण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष - करण गायकर, उमेश शिंदे सर ,प्रदेश अध्यक्ष -छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेना,, तानाजी गायकर नवनाथ रिकामे आदींनी वारंवार शासन दरबारी निवेदन देऊन ,प्रसिद्धी माध्यमातून पाठपुरावा केला होता.या मागणीला उचलुन धरत नाम.चंद्रकांत पाटील महसूलमंत्री महाराष्ट्र यांना शिष्टमंडळाने करण गायकर यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी बैठकीत हा निर्णय घेणे किती गरजेचे आहे हे निदर्शनास आणून दिले होते त्यामुळे सदर पोटखराबा जमिनीचा विषय मार्गी लावण्यात छावा क्रांतिवीर सेनेला यश आले आहे याचा फायदा महाराष्टातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे .त्यामुळे बुधवार दि.२७ जुलै २०१८ रोजी चंद्रकांत  पाटील यांच्या मुबंई येथील निवासस्थानी शेतकरी प्रतिनिधी सह त्यांचा सत्कार करून आभार मानन्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !