गुरूजींचा बे एके बे २७ जुलैला येतोय !! शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारी आव्हानात्मक भुमिकेत संजय खापरे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा, दीनानाथ यांचेकडून खास न्यूज मसालाच्या वाचकांसाठी !!

दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]

‘बे एके बे’मध्ये संजय खापरेंनी साकारले गुरूजी
                  काही मराठी कलाकारांनी हिंदीतही आपला ठसा उमटवत भारतीय सिनेसृष्टी गाजवली आहे. मराठमोळे अभिनेते संजय खापरे यांनीही मराठीसह हिंदीत साकारलेल्या भूमिकांचं सर्वांनीच कौतुक केलं आहे. आजवर नेहमीच विविधांगी भूमिका साकारण्याला प्राधान्य देणारे संजय खापरे आता ‘बे एके बे’ या आगामी मराठी सिनेमात गुरूजींच्या भूमिकेत दिसणार असून  येत्या २७ जुलै रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
                 शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करत समाजातील सत्य परिस्थितीवर बोट ठेवणाऱ्या ‘बे एके बे’ या सिनेमाची निर्मिती विकास भगेरीया आणि पूर्णिमा वाव्हळ - यादव यांनी थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि नमस्ते एंटरटेनमेंट फिल्म्स या बॅनरखाली केली आहे. हेमा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा आणि अनिता महेश्वरी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते असून प्रविण गरजे आणि चिंतामणी पंडित हे सहनिर्माते आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन संचित यादव यांनी केलं असून कथा आणि पटकथा लेखनही त्यांनीच केलं आहे. या सिनेमातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी यादव यांना एका सशक्त अभिनेत्याची गरज होती. कथा आणि व्यक्तिरेखा डोळयांसमोर ठेवून माधव गुरूजींच्या भूमिकेसाठी संजय खापरे यांची निवड केल्याचं यादव म्हणतात. संजय खापरे हे मराठी सिने सृष्टीतील एक नावाजलेले अभिनेते आहेत. ‘बे एके बे’मधील गुरूजींच्या व्यक्तिरेखेला तेच योग्य न्याय देऊ शकतील याची खात्री असल्याने त्यांची निवड केल्याचं यादव यांचं म्हणणं आहे.
         ‘बे एके बे’च्या निमित्ताने पुन्हा एकदा एक आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचं सांगत संजय म्हणाले की, या सिनेमाची कथा वर्तमान कालातील सत्य परिस्थितीवर आधारित आहे. समाजात आज जे घडतंय ते नाटयरूपात मोठया पडद्यावर मांडत तुमच्या आमच्या सर्वांच्याच डोळयांत अंजन घालणारी आहे. अशा एका आशयघन सिनेमातील माधव गुरूजींची भूमिका साकारण्यासाठी जेव्हा विचारण्यात आलं, तेव्हा कथा आणि व्यक्तिरेखा भावल्याने नकार देण्याचा प्रश्नच उदभवत  नव्हता. शिक्षण व्यवस्था आणि त्याच्या कारभारावर भाष्य करणारा सिनेमा असल्याने कथा ऐकल्यावरच भारावून गेलो होतो. ‘बे एके बे’च्या रूपात प्रेक्षकांना एक चांगला चित्रपट पाहायला मिळेल. अशी आशाही संजय यांनी व्यक्त केली.
         अभिजीत कुलकर्णा यांनी ‘बे एके बे’चं संवादलेखन केलं आहे. अभिजीतच्या साथीने संचित यादव यांनी गीतलेखन केलं असून, संगीतकार विलास गुरव यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. कला दिग्दर्शन देवेंद्र तावडे यांनी, तर नृत्य दिग्दर्शन संतोश आंब्रे यांनी केलं आहे. कॅमेरामन अतुल जगदाळे यांनी या सिनेमाचं छायालेखन केलंअसून संकलनाची बाजू कमल सैगल आणि विनोद चौरसिया यांनी सांभाळली आहे. व्हिएफक्सची बाजू शेखर माघाडेयांनी सांभाळली असून अतुल मर्चंडे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत. संजयच्या जोडीला या सिनेमात जयवंतवाडकर, संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ - यादव, संतोष आंब्रे, अतुल मर्चंडे आणि अरूण नलावडे यांच्या प्रमुख भूमिका असून साहिल सितारे, प्रथम सितारे, वैदेही ओव्हाळ, स्नेहल भाताडे, सागर गुरव, संचित निर्मळे, पार्थ देशपांडे, अथर्व खारवरकर, साईराज कामेतकर, स्वप्नजा जाधव, समिषा स्लपे, प्राची मेस्त्री, पूजा पोटफाडे, नेहा पावसकर, अविष्कार शेडये आदि बालकलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !