"माँ तुझे सलाम" , या कार्यक्रमाद्वारे शहिद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या मातापित्यांचा सन्मान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व शेअर करा !!
माँ तुझे सलाम......
नाशिक (२२) :- 3 एप्रिल 2018 रोजी मातृभूमीचे रक्षण करतांना महाराष्ट्राचा सर्वात लहान तरूण, जवान शुभम मुस्तापुरे हा शहिद झाला. ही बातमी महाराष्ट्रात पसरताच अवघा महाराष्ट्र रडला होता. अवघ्या विसाव्या वर्षी मातृभूमीसाठी बलिदान देणा-या काळीमातीच्या वीरपुञाच्या मातापित्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पञकार महासंघ यांच्या वतीने नाशिक शहरातील गंजमाळ येथील रोटरी हाॅल येथे "माँ तुझे सलाम" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
अवघ्या विसाव्या वर्षी बलिदान , भारत मातेचा पुञ देशासाठी कुर्बान,प्राणवाहुनी देशासाठी, देशासही अमर करे , वीर शहिद भारत सुपुत स्व.शुभम मुस्तापुरे...
धन्य माता पिता ज्यांना पुञ असा लाभला, आणिक धन्य ताही जो देशार्थ वारला , प्राणवाहुनी देशासाठी, देशासही अमर करे , वीर शहिद भारत सुपुत स्व.शुभम मुस्तापुरे....
जे देशासाठी मेले ते वीर हुत्मामे झाले, जे वीर मरणार्थ ...त्यांचे जीवन सार्थक झाले प्राणवाहुनी देशासाठी, देशासही अमर करे, वीर शहिद भारत सुपुत स्व.शुभम मुस्तापुरे.....
धन्य भारतमातेचे धन्य शिरीषकुमार असेपुन्हा पुन्हा जन्मावे हां ची युवा ध्यास असे प्राणदेऊन देशासाठी, देशासही अमर करे , वीर शहिद भारत सुपुत स्व.शुभम मुस्तापुरे...
या राजकवी चारूदत्त महेशराव थोरात लिखीत कवीतेचे वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. नरेश गिते , यंशवतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ नाशिक समन्वयक श्रींकात सोनवणे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर, स्वामी सोमेश्वरानंद, नगरसेवक गणेश गिते जिल्हा परिषद क्रुषी अधिकारी हेमंत काळे, पीआय डाँ सीताराम कोल्हे, सरकारवाडा वपोनि भगत साहेब आदि मान्यवर महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते
दरम्यान याप्रसंगी शहिद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या मातापित्याचा अर्थातच सुनिता मुस्तापुरे आणि सूर्यकांत मुस्तापुरे यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. नरेश गिते आणि यशवंत राव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ नाशिक समन्वयक श्रींकात सोनवणे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला
श्री.श्री.महामडंलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,
महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ राहुल जैन - बागमार , उपाध्यक्ष केतनभाई सोमय्या, सचिव कुमार कडलग, महेश थोरात जिल्हाध्यक्ष,नासिक लोकलचे संपादक सतिश रूपवते सदस्य,न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील सदस्य , आपला महाराष्ट्र न्युज चे संचालक संदेश केदारे आदिंच्या शुभहस्ते शहिद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या मातापित्याला एक लाख अकरा हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला.
याप्रसंगी शहिद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या मातापित्याने आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, शुभमचा आम्हाला अभिमान आहे , आज शुभम चा वाढदिवस आहे खरं तर आज कुठेच जाणार नव्हतो परंतु नाशिकच्या पञकारांनी वेळो वेळी फोनद्वारे संपर्क केल्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही नाशिकला आलोय, आम्हाला गर्व आहे आणि शुभम आमच्या आजही सोबत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करतांना शहीद जवानची माता सुनिता मुस्तापुरे बोलता बोलता थोडी शांत झाल्याने थोडी भावुक झालेली दिसली. शेवटी आई ती आईच.
त्यानंतर महेश धोडपकर प्रस्तुत मेघ मल्लार, निवेदक गणेश कड गायिका कंचन गोसावी, मिनल धोडपकर, अनिल धुमाल, अभिजीत शर्मा, स्वरांजय धुमाल यांनी मा तुझे सलाम , जिंदगी मौत ना मत जाऐ संभालो यारो, देश रंगीला रंगीला देश रंगीला... ये मेरे वतन के लोगो , जय जय महाराष्ट्र माझा, वंदे मातरम् अशी देशभक्तीपर गिते सादर करून उपस्थितांची मने जिंकली...
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ राहुल जैन बागमार यांनी आपले मनोगत व्यक्त करीत महासंघ यापुढेही विविध समाजहिताय उपक्रम राबविण्यासाठी नक्कीच प्रयत्नशिल आहे अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली
दरम्यान आभार पञकारमिञ अविनाश आहेर यांनी मानले
सौजन्य-
सागर केदारे - संपादक आपला महाराष्ट्र न्यूद नाशिक
धन्य माता - पिता....धन्यवाद🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा