छावा क्रांतीवीर सेनेचा बुधवारी संभाजीनगरांत झंजावात !!! दिशादर्शक ठराव मांडले जाणार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
छावा क्रांतीवीर सेनेचा बुधवारी संभाजी नगरांत झंझावात !
चौथ्या अधिवेशनात शेतकरी प्रश्नांसह, मराठा आरक्षणावर दिशा दर्शक ठराव मांडणार-करण गायकर
नाशिक/ प्रतिनिधी(११)::-अखिल मराठा बहुजन बारा बलुतेदार.अठरा पगड समाजाचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या अखिल भारतीय छावा क्रांतीवीर सेनेच्या संभाजीनगर (औरंगाबाद) येथे १३ जुन रोजी होणाऱ्या चौथ्या अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने छावा उपस्थित राहणार असून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातूनही अधिकाधिक छावा उपस्थित राहणार असल्याची माहीती छावाचे युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग यांनी दिली.
या अधिवेशनासाठी राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज, शांतीगीरी महाराज, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना.चंद्रकान्त दादा पाटील,संस्थापक अध्यक्ष करण गायकर, या प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
१३ जुन २०१८ रोजी होणाऱ्या या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, युवक बेरोजगारी,शेती मालाला हमी भाव या ज्वलंत विषयाबरोबर सध्या कळीचा मुद्दा ठरलेल्या मराठा आरक्षणावर ठोस दिशादर्शक भुमिका घेऊन ठराव केले जाणार आहेत.
हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी संभाजी नगर विभागातील छावा क्रांतीवीर सेनेच्या सर्व आघाडींचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह
छावा क्रांतिवीर सेना प्रदेश कार्यकारिणीचे
शिवाजीराजे मोरे(प्रदेश महासचिव), दिनकर मामा कोतकर(प्रदेश सरचिटणीस), विश्वनाथ वाघ(प्रदेश कार्याध्यक्ष), चंद्रशेखर विसे(प्रदेश संपर्क प्रमुख), संतोष माळोदे(प्रदेश उपाध्यक्ष), प्रा.उमेश शिंदे(वि.आ.प्रदेशाध्यक्ष), राम घायतिडक(वि.आ.प्रदेश उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर भाऊ थोरात(युवा प्रदेश कार्याध्यक्ष),पंकज जर्हाड(युवा प्रदेश संघटक), नवनाथ शिंदे(युवा प्रदेश सरचिटणीस ), नितिन दातीर(वि.आ.प्रदेश संघटक), वंदनाताई कोल्हे(प्रदेशाध्यक्ष महिला), मीराताई दुसाने( प्रदेश संघटक महिला), अनिताताई पैठण पगार(प्रदेश कार्याध्यक्ष महिला), गंगाधर औताडे (मराठवाडा कार्याध्यक्ष), अशोक ढवळे( युवा मराठवाडा अध्यक्ष), विशाल गव्हाणे( पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष), किरण बोरसे(आय.टी.प्रमुख),अविनाश कापड़ने(आय टी विभाग प्रदेश उपाध्यक्ष), गणेश गांजळे(विदर्भ अध्यक्ष), राहुल भावसार आदी प्रयत्नशील आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा