घरकुल योजनेसंदर्भात ग्रामपंचायतींची सुनावणी घेणार! अपूर्ण घरकुले तसेच दुसरा व तिसरा हप्ता वितरण बाबत ३१ मे रोजी सुनावणी !!


नाशिक - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत कमी प्रगती असणाऱ्या तालुक्यांची सुनावणी घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी घेतला आहे. 31 मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ही सुनावणी होणार आहे.
घरकुल योजनेत ज्या तालुक्यातील ग्रामपंचायतींचे काम सर्वात कमी आहे, घरकुले मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत तसेच दुसरा व तिसरा हप्ता अद्याप वितरित केलेला नाही अशा ग्रामपंचायतीची सुनावणी केली जाणार आहे.या सुनावणीत संबंधित ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, उप अभियंता,शाखा अभियंता,स्थापत्य अभियंता,ग्रामीण गृह निर्माण अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरकुले वेळेत का पूर्ण झाले नाही, कामे प्रलंबित राहण्याची कारणे आदींबाबत यावेळी संबंधितांना विचारणा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !