जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहितास सर्वोच्च प्राधान्य द्यावे-पोलीस आयुक्त डाँ.रविंद्रकुमार सिंगल, शहीद पोलीस शिपाई फिरोज पठाण यांना स्मरणांजली अर्पण , महाराष्ट्रातील पहील्याच मार्गदर्शक उपक्रमाचे आयोजन

नासिक(3)::-जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे असे आवाहन शहीद पोलीस शिपाई फिरोज अफजलखान पठाण यांच्या स्मरणांजली कार्यक्रमा प्रसंगी नासिक पोलीस आयुक्त डाँ रविंद्रकुमार सिंगल यांनी केले.
       शहीद पोलीस शिपाई पठाण यांच्या स्मरणांजली कार्यक्रमाचे आयोजन के.टी.एच.एम.महाविद्यालयाच्या व्हि.एल.सी.सभाग्रुहात करण्यात आले होते.
      प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन तसेच शहीद पठाण यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रतिमेसमोर पुष्पचक्र अर्पण करतेवेळी अफजलखान पठाण (शहीद फिरोज यांचे  वडील) यांना त्यांच्या भावना अनावर झाल्याने शहीद मुलाच्या आठवणीने अश्रुंना वाट करू द्यावी लागली त्यावेळी सभाग्रुहातील वातावरण भावनिक झाले होते.
          पोलीस खात्यात अधिकारी व कर्मचारी हे जनतेच्या सेवेसाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र सेवा बजावत असतात, वेळप्रसंगी कायद्याची अंमलबदावणी करतांना कधीकधी कठोर कारवाई करावी लागते, जनता व पोलीस समोरासमोर येतात तेव्हा पोलीसही आपल्यासारखेच आहेत ही जाणीव जनतेनेही ठेवायला हवी, मात्र अशा प्रसंगी काही अघटीत घडते अशा वेळी प्रत्येकाने स्वहितापेक्षा जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहितास प्राधान्य द्यायला हवे असे प्रतिपादन नासिक पोलीस आयुक्त डाँ. रविंद्रकुमार सिंगल यांनी व्यक्त करताच उपस्थितांनी हात उंचावून या वाक्याला दुजोरा दिला.
       याप्रसंगी समाजाला जे हवे ते देण्याचा प्रयत्न सातत्याने करणारे नासिक शहराचे नासिककरांच्या मनांत विश्वासाचे स्थान निर्माण करणारे पोलीस आयुक्त डाँ.रविंद्रकुमार सिंगल, सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, पोलीस उपायुक्त श्रीक्रुष्ण कोकाटे, माधुरी कांगणे,यांच्या हस्ते शहिदांच्या कुटुंबियांचा सह्रुदय सन्मान करण्यात आला.
     प्रास्ताविक सहा.पोलीस आयुक्त डाँ.राजू भुजबळ यांनी केले, महाराष्ट्र पोलीस दलाचा हा अभिनव असा राज्यभरांतील पहिलाच उपक्रम असुन पोलीसांच्या कार्याची ओळख नासिककरांना झाली. या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने जाती-धर्मापलिकडचे नासिक व नासिक पोलीस गणले गेलेत अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाँ.दिलीप पवार यांनी केले व आयुक्तांच्या मनांतील यशस्वी पोलीसिंग प्रकार मनापासुन राबविणारे सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी