महाराष्ट्रातील काही पोलीस ठाण्यांमधील पाठीमागच्या मार्गाची चर्चा घडणे कितपत योग्य आहे !

काही पोलीस ठाण्यांमध्ये मागील दरवाजाने वा आवारातील मागच्या दाराने काय काय बाहेर पडते?
म्हसरूळ पोलीस ठाण्यातूनच मागच्या दरवाजाने संशयित मोबाईल खरेदीदार मोबाईल घेऊन पसार,  याविषयाशी संबधित बातमी नासिकमधील आजच्या दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे, कुंपणच शेत खाते आहे का ? अशी प्रतिमा पोलीस ठाण्यांतील या घटनेतून प्रथमदर्शनी दिसत आहे, ओएलएक्स वरील मोबाईल विक्रीच्या  माहीतीच्या आधारे पोलीस ठाण्यात मोबाईल विक्रेत्यास खरेदीदार बोलावून घेतो व थोड्याच वेळात पोलीस ठाण्याच्या पाठीमागील मार्गातून पसार होतो हा प्रकार नक्की काय ? अशी शंका निर्माण होत नाही का ? संबधित ठाण्यातील सीसीटीव्ही शोभेचे आहेत का ? की कुण्या मध्यस्थाचे कारनामे लपविण्यासाठी फुटेज उपलब्ध होत नाही अशी शंका तक्रादाराकडून वक्त होत आहे? याची वरिष्ठांकडून खातरजमा होऊन प्रकरण नक्की काय आहे ?  याचा उलगडा होईल तेव्हा होईल परंतू पाठीमागील मार्गाची उपयुक्तता हा चर्चेचा विषय ठरावा का ? ही पळवाट समजावी की इतिहासात वापरायचे तसा (गरजेची) खुष्कीचा मार्ग समजावा ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी