सहा महिन्यानंतर, अधिक सुविंधांसह, दिव्य कार्निव्हल सिनेमाज आजपासुन सुरू ! प्रथममच डाल्बी 7.1 साउंड सिस्टिमचा वापर !
सहा महिन्यानंतर दिव्य कार्निव्हल सिनेमाज आजपासुन नासिककरांच्या सेवेत रूजू !
प्रथममच डाल्बी 7.1 साउंड सिस्टिम चा वापर !
नासिक::- दिव्य कार्निव्हल ने सहा महिन्यांत टप्प्या-टप्प्याने पूर्विची मेकओव्हर पद्धत बदलत आज एका आकर्षक मल्टिप्लेक्स ची श्रुंखला सुरू करून चित्रपट चाहत्यांना एक नवीन आनंददायी सुखकारक अनुभूती देण्याचा दिव्य कार्निव्हल सिनेमाजकडून उपलब्ध करून दिल्याची माहीती डाँ. श्रीकांत भासी यांनी पत्कार परिषदेच्या माध्यमातून दिली.
पहिल्यापेक्षा लांब व रूंद पडदे, 7.1 डाँल्बी साऊंड सिस्टिम च्या आधुनिक टेक्नालाँजीचा वापर करण्यात आलेले स्वयंपूर्ण मल्टिप्लेक्स प्रेक्षकांना आवडेल व सुरक्षित वातावरणाने चित्रपटाचा आनंद द्विगुणीत करेल, १०५३ बैठकांची क्षमता तसेच सर्व पडदे 2K प्रोजेक्षन प्रणाली युक्त असल्याने उचित प्रकाशात 3D चित्रपट पाहण्यासाठी अनुकुल आहे.
सर्वसाधारण पणे टप्प्या-टप्प्याने मल्टिप्लेक्स अपग्रेड केली जातात मात्र कार्निव्हल सिनेमाजकडून या चित्रपटग्रुहास अपग्रेड (नवीनीकरण) करण्यासाठी सहा महिने पूर्णत: बंद ठेवण्यात आले. वरिष्ठ मंडळींना १८० अंशात मागे टेकुन सिनेमा बघता येईल अशा सीटस् दोन पडद्यांवर उपलब्ध आहेत, अशी माहीती कार्निव्हल सिनेमाजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन उमरोटकर यांनी दिली.
कार्निव्हल सिनेमाज २० राज्याततील ११५ शहरांमधील ४३० पडद्यांना सामावणारी भारतातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्सची साखळी असुन वर्षभरांत ५ कोटी प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे, सिंगापूर मध्ये ६ पडदे सुरू करून विदेशी बाजारपेठेत प्रवेश करणारी संस्था आहे. झारखंड आणी उडीसा सरकारशी करार करून ७५ चित्रपटग्रुहे-कम-रिक्रिएशन झोन व १५० पडदे उभारणार आहे, २०१८ मध्ये १००० पडद्यांचे लक्ष्य कार्निव्हल सिनेमाजने समोर ठेवले असुन ते लवकरच पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली.
नासिककरांना कार्निव्हल सिनेमाजचे दिव्य कार्निव्हल सिनेमाज, पुरब-पश्चिम प्लाझा, त्रिमुर्ती चौक, नवीन नाशिक हे पसंद पडेल व कुटुंबासहीत चित्रपटाचा आनंद देईल असे प्रतिपादन पत्रकार परिषदेप्रसंगी मोहन उमरोटकरांनी व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा