प्रगत आयव्ही कंटेनर मानवता कॅन्सर सेंटरमध्ये उपलब्ध रुग्णालयातील लो हायजीनमुळे होणाऱ्या गंभीर संसार्गांवर तोडगा नाशिक, २ एप्रिल २०१८::- रुग्णालयात विशेषतः क्रिटीकल युनिट्समध्ये कमी दर्जेच्या वैद्यकीय उपकरणांचा वापर आणि रुग्णालयातील अस्वच्छता यामुळे रोगाशी आधीच झुंजणाऱ्या रुग्णांना विविध संसर्ग होण्याची दाट शक्यता असते ज्याने त्यांच्या आधीच कमकुवत झालेल्या प्रकृतीला अधिक धोका संभवतो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे आणि लो हायजीनमुळे संसर्ग झाल्याचे आपल्याला काही नवीन नाही. बॅ्क्टेरिया, फंगस ह्याने कित्येक रुग्ण हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शनला बळी पडतात. यात रक्तप्रवाहाचा संसर्ग, न्यूमोनिया, मूत्रमार्गात संसर्ग (यूटीआय), सर्जिकल साईट इन्फेक्शन (शस्त्रक्रियेतून उद्भवलेले संक्रमण) याचा समावेश आहे. वेळेत निदान न झाल्यास हे प्रकृतीस आणखी गंभीर ठरू शकतात असे मत एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिकचे अध्यक्ष आणि सर्जिकल ओन्कोलॉजिस्ट डॉ. राज व्ही. नगरकर यांनी केले. मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जाणाऱ्या रुग्णांना अशा संसार्गांचा धोका अधिक संभावतो असेही ते म्हणा...