नासिक पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल हरलेत !

 नरेंद्र पाटील

संपादक-न्यूज मसाला,नासिक

 विडंबनात्मक लिखाण पद्धत धर्तीवर हा लेख असुन कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.-संपादक

नासिक::-नासिकचे पोलीस आयक्त रविंद्रकुमार सिंघल आजच्या परिस्थितीत हरलेत असे म्हटल्यास हि नासिककरांच्या भविष्यात डोकावल्यास संयुक्तिक वाटणार नाही.
   साहेब आपण हरलात ही बाब आपणांस रूचणार नाही व तशी मान्यही करायला नको या मताचा मीही आहे, आपले बालपण दिल्लीत गेले, तेथेच इंजिनियरींगची पदवी प्राप्त केली, मास कम्युनिकेशन मधील पदविका, मानवाधिकार यांत पदव्युत्तर शिक्षण व डाँक्टरेट मिळविली, या इतक्या मोठ्या शिक्षणाच्या जोरावर राबवित असलेले उपक्रमांबाबत थोडा वेगळा विचार केल्यास, का करताहेत जनहितासाठी कार्य जे आज कुणाला कौतुकास्पद वाटणार नाही, आज रामनवमीचा दिवस , प्रभु रामचंद्रानाही वनवास भोगावा लागला व यांच कारणामुळे त्यांचे पदस्पर्श नासिकला लागले तीच हि पुण्यनगरी तेथे आपणही यांवे व अफलातून कार्य करावे, फरक इतकाच की आपण वनवास भोगायला आला नाहीत पण वर्षानुवर्षे समाजातील काही घटक वनवास भोगत होते त्यांना पावण करण्याच्या शक्तीचा (बुद्धी) वापर करित आहात इथेच आपण 'हरलात'.
    दिल्ली पोलीस मध्ये नोकरी केलेल्या पिताश्रींना गुरूस्थानी-प्रेरणास्थानी मानून नासिककरांच्या उज्वल  भविष्यासाठी नासिक रन सारख्या अनेक सामाजिक उपक्रमातून जो नासिक पोलीसांचा सहभाग नोंदवित आहात तो आज नाही पण भविष्यातील कौतुकास पात्र ठरल्यावाचून राहणार नाही, इथेच आपण हरलांत,
    नासिक रन, महिलांचा महिलादिनी सत्कार, हेल्मेट वापर प्रबोधन, सायकल रँली, नो हाँर्न डे, नासिककरांमध्ये आपसूक निर्माण होत असलेला आत्मविश्वास, सलोखा, प्रशासकीय कामकाजाची आपल्यास्तरावरून होत असलेली सुधारणा, वा अशाच प्रकारचे अनेक उपक्रम याचा चांगला, दूरगामी परिणाम, कायदा व सुव्यवस्थेसाठी भविष्यात निश्चित दिसेल. तरीही आपण हरलात !
      साहेब, काय संबंध तुमचा नासिकशी, कधीकाळी आपण व आपल्या खात्यातील जवानांनी(खरोखर जवानच) पोलीस दलाची नोकरी स्वीकारली तेव्हा घेतलेली शपथ, व तिचा विसर पडू द्यायचा नाही ही भावना पोलीसांमध्ये अपरोक्षपणे आपल्या कार्यातून रूजविण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यांचा आत्मविश्वास सबळ करित आहात, पोलीस-जनतेत समन्वय साधत, पोलींसांची जनसामान्यांमध्ये असलेल्या प्रतिमेला एक नवा आयाम देण्याचे काम आपल्या हातून घडत आहे, इथे आपण हरलात ?
      नासिककरांच्या तसेच पोलीसांच्या मनातील भावनांना हळुवारपणे स्पर्श करित आहात, असे अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते तेव्हा आपण कुठेतरी हरता आहात !
   पंचवीस लाखाच्या आसपास असलेल्या शहरांत गुन्हे घडतील, या गुन्ह्यांचा आलेख शहरागणिक त्याच्या भौगोलिक, राजकीय, सामाजिक, बेरोजगारी या मुद्द्यांवर कमीजास्त असणारच, तसा नासिकलाही राहील यांत काही दुमत नाही पण आपल्या दूरस्थ नजरेने जे पाहीले  त्याचे परिणाम आज नासिककरांना स्पष्टपणे दिसणार नाहीत, जेव्हा आपण नासिकमधून बदलीने जाल त्यानंतर काही काळाने नासिककरांना दिसतील, व तेव्हा तुमची आठवण होत राहील , इथेच आपण हरलात !
      साहेब, आपण हरलांत हे लिहीण्यामागचा हेतु इतकाच आहे की , गेल्या वीस-पंचवीस वर्षापासुन मी नासिकला बघतोय, आपणही प्रशिक्षणार्थी म्हणून आलात , 2002-03 ला पोलीस अधिक्षक (ग्रा.) व आता पोलीस आयुक्त या नात्याने   दोन कुंभमेळ्यांचे  यशस्वी नियोजन बद्दल डीजींकडून सन्मानित केले गेलात तेथे ज्या पद्धतीने नासिकची वाढ व गुन्ह्यामधील वाढ दिसत होती तीला अनेक अंशी ब्रेक लावला आहे, अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर असतांनाच आपण नासिकला पुन्हा आलात, जुगार, दारू, मटका सारखे अवैध धंदे बंद केले, तेथील अनेक कामगार ,रिक्षा चालक, हाँटेलमध्य़े कामाला लागलेत, काहींनी छोटे उद्योग सुरू करून स्वाभिमानाने जगणे सुरू केले आहे,  आज त्यांना व्यवसाय, नोकरी बदलावी लागली, नेहमीच्या सवयीला बगल द्यावी लागली ती अात्मसात करण्याच्या नादांत ते आपल्याबद्दल विरोधी भाषा वापरत असतील, परंतु त्यांच्यात भविष्यातील येणारे धोके टळले आहेत व हे सर्व आपल्या अनुभवाच्या जोरावर जसे की युनायटेड नेशन्स मधील (भारतातील एकमेव अधिकारी असल्याचा अभिमान ) युद्ध गुन्हे शोध च्या मुख्य अधिकारी कारकीर्दीच्या अनुभवाचा वापर केला हे आपल्या उपक्रमांमधून तसेच  टीमकडून रूजविणे,  चांगले व पारदर्शी काम करित राहण्याच्या नादांत  राहून गेले आहे असे वाटते म्हणून आपण आज हरलांत ?

आपण जिंकलात हे सांगण्याचा हा प्रयत्न आम्ही करित आहोत याबद्दल क्षमस्व !
आपण हरलांत नासिककरांच्या उज्वल भविष्यासाठी ,
न्यूज मसाला परिवाराकडून सलाम तुमच्या कार्याला , उद्याच्या सुखी नासिककरांकडून आजच आपल्या नासिकच्या उर्वरित सेवा कालावधीसाठी व भविष्यातील इतर ठिकाणच्या सेवेसाठी भरभरून शुभेच्छा !!!

टिप्पण्या

  1. Seems biiased . None of red light signal have Police. Instead u can find them at nooks inorder for settlement under No helmet or no parking. City has lacks parking arrangements. Vehicle towing with rude actions from staff is common.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल