पोस्ट्स

जलसंपदा विभागाने हिशेब द्यावा, नाशिककरांना ठोस उत्तरे द्यायला हवीत !

इमेज
संपादकीय  जलसंपदा विभागाने हिशेब द्यावा, नाशिककरांना ठोस उत्तरे द्यायला हवीत ! राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते लवकरच सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होत आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे खूप काटेकोर नियोजन करणे जलसंपदा विभागासाठी डोकेदुखी ठरू नये यासाठी पारदर्शक प्रयत्न व्हावेत. केवळ बैठका, आश्वासने आणि कागदोपत्री नियोजन पुरेसे नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरीत पाणी सोडण्याची तयारी करताना जलसंपदा विभागाने जनतेसमोर पाण्याचा संपूर्ण ताळेबंद मांडला पाहिजे. १५ ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करताना त्यासाठी जिल्ह्यातील धरणांचा यथोचित आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. यासाठी जनसामान्यांच्या पुढील काही ठोस मागण्या आहेत.        धरणनिहाय जलसाठ्याचा ताळेबंद जाहीर करा! गंगापूर, मुकणे, दारणा, आणि दिंडोरी तालुक्यातील संबंधित धरणांतील उपयुक्त जलसाठा, मंजूर पाणीआरक्षण, अपेक्षित वापर आणि कुंभमेळ्यासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची अधिकृत आकडेवारी सार्वजनिक करावी.        कुंभमेळ्यातील प्रत्येक प्रमुख स्नानपर्वणीसाठी किती पाणी आवश्यक आहे, ते ...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन, अभियानात दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्या–मुख्यमंत्री

इमेज
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन अभियानात दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्या–मुख्यमंत्री मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पहिल्या पर्वातील पुरस्कारांचे  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण नाशिक, दि. १० ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.०पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे, तलावांतील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या कामांसाठी राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही  त्यांनी दिली.     ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्यावतीने आयोजित ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान लोकप्रतिनिधींचा महाकुंभ’, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा, अभियान २०२६-२७...

साप्ताहिक न्यूज मसाला चा दि. ८ आक्टोंबर २०२६ चा अंक

इमेज

वाडिया रुग्णालयामुळे मालेगावकरांना दर्जेदार आरोग्यसेवेची सुविधा ! रुग्णालयासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही :शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

इमेज
वाडिया रुग्णालयामुळे मालेगावकरांना दर्जेदार आरोग्यसेवेची सुविधा ! रुग्णालयासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही  :शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे                   मालेगाव (उमाका वृत्तसेवा) : मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या वाडिया रुग्णालयामुळे शहरातील नागरिकांना विशेषतः गरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य, तज्ज्ञ डॉक्टर तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक सहकार्य केले जाईल. असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.                  महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाडिया रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मालेगाव शहर महापालिकेच्या महापौर शेख नसरीन बानो मो. खालिद, महानगरपालिका आयुक्त र...

जागतिक रेबीज दिन, प्रतिबंधात्मक उपचारातून रेबीजपासून बचाव शक्य-डॉ.अविनाश गोरे

इमेज
जागतिक रेबीज दिन प्रतिबंधात्मक उपचारातून रेबीजपासून बचाव शक्य- डॉ.अविनाश गोरे रेबीज हा विषाणूमुळे होणारा गंभीर व जीवघेणा आजार आहे. रेबीजची लक्षणे सुरू झाल्यानंतर हा आजार जवळजवळ नेहमीच प्राणघातक ठरतो. मात्र, प्राण्याच्या चाव्यानंतर वेळ न दवडता योग्य प्रतिबंधात्मक उपचार घेतल्यास रेबीजपासून बचाव शक्य आहे. त्यामुळे कुत्रा किंवा अन्य संशयित प्राण्याने चावा घेतल्यास घाबरून न जाता तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.              दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन पाळला जातो. रेबीज प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे, प्राण्यांचे लसीकरण वाढविणे आणि प्राण्याच्या चाव्यानंतर तातडीने प्रतिबंधात्मक उपचार घेण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यात कुत्रे तसेच माकडांच्या चाव्यानंतर रेबीजच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक दक्षता घेणे गरजेचे आहे.     जखम १५ मिनिटे साबण व वाहत्या पाण्याने धुवा रेबीज प्रामुख्याने संक्रमित प्राण्याच्या लाळेद्वारे पसरतो. मानवांमधील बहुतांश रेब...

रक्तदानाचे दीड शतक पूर्ण करणारा सेवाव्रती पत्रकार. विश्वविक्रमी रक्तदाते पत्रकार डॉ.दिलीप केदारनाथ कोठावदे यांचा प्रेरणादायी, भावस्पर्शी रक्तदान प्रवास

इमेज
रक्तदानाचे दीड शतक पूर्ण करणारा सेवाव्रती पत्रकार _विश्वविक्रमी रक्तदाते पत्रकार डॉ.दिलीप केदारनाथ कोठावदे यांचा प्रेरणादायी, भावस्पर्शी रक्तदान प्रवास_ “रक्ताला जात नसते, धर्म नसतो, भाषा नसते, प्रांत नसतो… रक्ताला एकच ओळख असते—माणुसकी..!” आणि याच माणुसकीच्या नात्याला आपल्या आयुष्याचा धर्म मानून, रक्तदानाची अखंड सेवा करणारे ज्येष्ठ पत्रकार डॉ. दिलीप केदारनाथ कोठावदे, नाशिक यांनी आपल्या रक्तदानाच्या प्रवासातील १५० वे रक्तदान पूर्ण करण्याचा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि समाजप्रबोधनकारी टप्पा येत्या रविवारी २७ सप्टेंबर २०२६ रोजी गाठला जाणार आहे. रक्तदानाच्या क्षेत्रात १५० वेळा स्वतः रक्तदान करणे ही केवळ आकडेवारी नाही; तर त्यामागे अनेक वर्षांची निष्ठा, सातत्य, सामाजिक जाणीव आणि माणसाच्या जीवनाविषयी असलेली अपार आस्था दडलेली आहे. म्हणूनच डॉ. कोठावदे यांचा हा प्रवास रक्तदान करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी, समाजासाठी अनुकरणीय आणि मानवतेच्या इतिहासात लक्षवेधी ठरतो. १८व्या वाढदिवशी सुरू झालेला अखंड सेवाप्रवास डॉ. कोठावदे यांच्या रक्तदानाची सुरुवात त्यांच्या १८व्या वाढदिवशी झाली.  ...

रविवारी मविप्रची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा : सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. १,२२९ कोटींचे विक्रमी अंदाजपत्रक, ६०० हून अधिक सामंजस्य करार, ७,६१४ विद्यार्थ्यांना रोजगार......

इमेज
मविप्रची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी : सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे ---------------------------------- १,२२९ कोटींचे विक्रमी अंदाजपत्रक ; ६०० हून अधिक सामंजस्य करार, ७,६१४ विद्यार्थ्यांना रोजगार ---------------------------------- नाशिक : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन गेल्या ११२ वर्षांपासून जिल्ह्यातील अठरापगड जातीतील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाज अर्थात, ‘मविप्र’ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २० रोजी दुपारी १:०० वाजता मराठा हायस्कूलच्या कै. तुकारामजी रौंदळ सभागृहात संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने संस्थेने प्रकाशित केलेला ११२ वा वार्षिक अहवाल व मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त संस्थेच्या सर्व १० हजार ६६० सभासदांपर्यंत घरपोच दिले आहेत. तसेच त्यासोबत संस्थेचे मुखपत्र असलेल्या मविप्र पत्रिकेचा ‘रोजगार विशेषांक’ देखील प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचविण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवार दि. १८ रोजी आयोजित पत्रकार परिषदेस संस्थेचे सभापती ब...

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद, देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

इमेज
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग 42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care' चा संदेश        नाशिक : किडनीचा आजार म्हणजे केवळ किडनीपुरता मर्यादित असलेला आजार नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वाढते वजन आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक समस्या किडनीच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. विशेष म्हणजे किडनीच्या आजाराची सुरुवात अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता होते. त्यामुळे आजार गंभीर होण्यापूर्वी त्याची कारणे, सुरुवातीचे संकेत आणि आवश्यक तपासण्या याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर '360° Kidney Care' चा संदेश घेऊन नाशिकमध्ये देशभरातील नामांकित किडनी विकार तज्ज्ञांची प्रतिष्ठित परिषद आयोजित करण्यात आली आहे.          इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (ISN) - वेस्ट झोन आणि नेफ्रॉलॉजी फोरम ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४२ वी किडनी विकार तज्ज्ञांची (42nd ISN West Zone Conference 2026) ही परिषद ११ ते १३ ...

गौतमी गोदावरी धरणातील बेटावर त्र्यंबकराजांची प्रतिकृती उभारणार

इमेज
सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ गौतमी गोदावरी धरणातील बेटावर त्र्यंबकराजांची प्रतिकृती उभारणार पर्यटन विकासासाठी १७ कोटी ३४ लाख ९० हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी नाशिक ::- नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्य सिंहस्थ महाकुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी गौतमी गोदावरी धरण परिसरातील बेटावर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकराजांची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. या कामासह मूर्ती परिसराचा विकास व विद्युत सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून एकूण १७ कोटी ३४ लाख ९० हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.          कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग यांच्या प्रस्तावानुसार श्री त्र्यंबकराजांच्या प्रतिकृतीच्या उभारणीसाठी ९ कोटी ९८ लाख रुपये, प्रतिकृर्ती सभोवतालच्या परिसर विकासासाठी ५ कोटी ४१ लाख रुपये, तर प्रतिकृतीसाठीचा परिसरात विद्युत कामांसाठी १ कोटी ९४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याबाबतची निविदाही प्रसिद्ध झाली असून लवकरच या कामास सुरुवात होणार आहेत....

समस्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी पोर्टलचा सकारात्मकतेने वापर करणे आवश्यक -- कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

इमेज
समस्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी पोर्टलचा सकारात्मकतेने वापर करणे आवश्यक - कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन        नाशिक :  - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या जलद आणि पारदर्शक पद्धतीने विद्यापीठापर्यंत पोहोचण्यासाठी पोर्टल सारख्या माध्यमाची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषद बैठकीत विद्यापीठातर्फे ऑनलाइन विद्यार्थी तक्रार निवारण पोर्टलचा शुभारंभ कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांच्या हस्ते करण्यात आला. या बैठकीस अध्यक्षस्थानी डॉ. गिते यांच्या समवेत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सचिन मुंबरे, डॉ. विलास वांगीकर, डॉ. मिलिंद आवारे, डॉ. विठ्ठल धडके, डॉ. राजकुमार पाटील, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बी. जे. सोनकांबळे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. देवेंद्र पाटील, अधिष्ठाता डॉ. किरण पाटोळे उपस्थित होते.                       यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ....