"राडा" इव्हेंट, खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम ! युवांमध्ये उतुंग उत्साह!
राडा’ इव्हेंट: नाशिकमध्ये खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम युवांमध्ये उतुंग उत्साह! नाशिक ::- नोव्हेंबरला नाशिकमध्ये आयोजित झालेल्या ‘राडा’ इव्हेंटने शहरातील खेळ व प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक नवीन अध्याय घडवला. Metamorph MMA आणि Merakii Events and Gifting यांच्या संयुक्त विद्यमाने २४/७ फिटनेस जिम, बोधलेनगर, नाशिक येथे आयोजित या बहुउद्देशीय कार्यक्रमात १०० हून अधिक स्पर्धकांनी आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. यामुळे प्रेक्षक आणि क्रीडा प्रेमींमध्ये उत्साहाची नवचेतना निर्माण झाली. आजच्या काळात देशातील युवा—विशेषतः लहान मुले—मोबाइल फोन आणि ऑनलाईन गेमिंगकडे आकर्षित होत असल्याने त्यांच्या शारीरिक खेळांकडे असलेल्या ओढीत घट होत आहे. अशा परिस्थितीत, ‘राडा’ सारख्या रोमांचक क्रीडा स्पर्धांनी युवांमध्ये नवऊर्जा आणि जोश निर्माण केला. हा कार्यक्रम केवळ स्पर्धा न ठरता, तरुणांना आभासी जगातून बाहेर पडून घाम गाळण्यास, स्वतःमधील प्रतिभेला उजाळा देण्यास आणि तिला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यास प्रेरक ठरला. ...