विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीअभ्यास, कला - क्रीडा यांचा समन्वय डॉ. शेफाली भुजबळ यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
अभ्यास, कला - क्रीडा यांचा समन्वय
 डॉ. शेफाली भुजबळ यांचे प्रतिपादन

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801,

        नाशिक  (प्रतिनिधी)- उत्तम समाज निर्मितीसाठी चांगले नागरिक असणे आवश्यक असते. चांगला माणूस घडविण्याचे काम विद्यार्थी दशेपासूनच करावे लागते. आदर्श विद्यार्थी देशाचे उद्याचे भवितव्य असतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक असून अभ्यासाबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान व पारंपरीक कला, क्रीडा नैपुण्य यांचा समन्वय साधणे ही काळाची गरज आहे. ती गरज मीना भुजबळ स्कुल ऑफ एक्सलन्स निश्चितच पूर्ण करेल असे प्रतिपादन एमईटीच्या मार्गदर्शक डॉ. शेफाली भुजबळ यांनी केले.

        एमईटी - भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात काल नव्याने सुरु असलेल्या मीना भुजबळ स्कुल ऑफ एक्सलन्सच्या ओरिएंटेशन - परिचयाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभ्रा वर्मा यांनी पालकांशी संवाद साधला. जून महिन्यात सिबीएसई बोर्डाचे बालवाडी पासून इ. पाचवीपर्यंतचे वर्ग सुरु होतील. नंतर टप्प्याटप्प्याने बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणाला अनुसरून योग्य बदल केले आहेत. एका वर्गात मर्यादित विद्यार्थी संख्या असेल. शाळेत सुसज्ज लॅब, ऍक्टिव्हीटी वर्ग, इ-लायब्ररी, म्युझिक स्टुडिओ, ऑडोटोरियम, स्मार्ट क्लासरूम, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, सीसीटीव्ही या सुविधा व उच्चशिक्षित शिक्षकवृंद असतील. पंचकोषावर आधारित शिक्षणपद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांच्या शरीरिक, प्राणिक, मानसिक, बौद्धिक व आंतरीक क्षमतांचा विकास केला जाईल. विद्यार्थ्यांना व पालकांना ऍप् देण्यात येणार आहे त्यामुळे शाळेव्यतिरिक्त वेगळ्या कोचिंग क्लासेसची गरज उरणार नाही. येथे घडणारे विद्यार्थी नोकऱ्या मागणारे नाही तर रोजगार देणारे होतील असेही त्यांनी नमूद केले.

         कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन रवींद्र माणके यांनी केले. संकेत माळी यांनी विद्यार्थ्यांनी व्हिडीओ बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. हरिजित लांगिया यांनी विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन स्मार्ट क्लासची प्रात्यक्षिके सादर केली. अतुल नारंग यांनी नृत्याचे जीवनातील फायदे याविषयी माहिती दिली. यावेळी सुमारे २०० पालक आपल्या पाल्यांसह उपस्थित होते. त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. एमईटीचे विश्वस्त समीर भुजबळ उपस्थित होते. चेअरमन छगन भुजबळ व विश्वस्त पंकज भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या. 

************************************ 
        सर्वांगीण विकासासाठी बरेचकाही !
            विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी  अभ्यासाबरोबरीने कला, क्रीडा यांना अभ्यासक्रमात महत्वाचे स्थान देण्यात येणार आहे. त्यांची दालने कार्यक्रमापूर्वी लावण्यात आली होती. त्यात ग्लास पेंटिंग, हस्तकला, इंक पंटिंग, कॅनव्हास पेंटींग, सुलेखन, पॉटरी यांचा समावेश होता. मार्शल आर्ट, स्केटिंग झुंबा डान्स, रोबोटिक्स यांची प्रात्यक्षिके मुलामुलींनी सादर केली. त्यात आलेले पालक व लहान मुलेमुली रममाण झाले. मुलांनी स्वतः कलानिर्मितीचा आनंद लुटला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल